जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाची संधी - वर्षा ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:38+5:302021-02-26T04:24:38+5:30
जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती गोदावरी, आसना, लेंडी, पैनगंगासारख्या नद्याचे विस्तीर्ण जाळे, या नद्याचे पाणलोट क्षेत्र लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ...
जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती गोदावरी, आसना, लेंडी, पैनगंगासारख्या नद्याचे विस्तीर्ण जाळे, या नद्याचे पाणलोट क्षेत्र लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाची संधी दडली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ८ लाख ७९ हजार ५२९ गायी, गुरे, २९ हजार २७९ शेळी व मेंढ्या एवढीच पशू जनगणनेत नोंद आहे.
जिल्हा कृषी क्षेत्रात आणि पुरेशा पाण्याच्या दृष्टीने समर्थ असूनही आपण जिल्ह्यातील एकूण दुधाच्या मागणीपैकी दहा टक्केही दुधाचे उत्पादन जिल्ह्यात होत नाही. याचाच अर्थ शेतीपूरक उद्योगामध्ये दुग्ध व्यवसायाला ९० टक्क्याची संधी उपलब्ध असल्याचे ठाकूर यांनी निर्दशनास आणून दिले. ग्रामीण भागातील बेरोजगार युवा शक्तीला दुग्ध व्यवसायाकडे वळविण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे व्यापक जनजागृती करुन विविध सेवाभावी संस्थांचा यात सहभाग घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.