सावळीची पाणीयोजना अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:56 AM2018-05-18T00:56:28+5:302018-05-18T00:56:28+5:30

तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़

The last stage of the slack water project | सावळीची पाणीयोजना अंतिम टप्प्यात

सावळीची पाणीयोजना अंतिम टप्प्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे१ कोटी ६२ लाखांची योजना, सप्टेंबरअखेर होणार पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़
दुष्काळजन्य परिस्थितीत येथे टँकरनेही पाणीपुरवठा करण्याची वेळ येत होती़ गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत होता़ गावाची कायम टंचाई दूर करण्यासाठी गाव पातळीवर पाणीपुरवठा समिती करण्यात आली़ गावकऱ्यांनी नागनाथ पाटील नागराळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड केली़ सन २०१५ च्या काळात तत्कालीन सरपंच सविता पाटील यांच्या उपस्थितीत ठराव घेऊन नवीन अद्ययावत पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न सुरू झाले़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सर्व अंदाजपत्रक तयार होऊन गोदावरी पात्रातून पाणीपुरवठ्यासाठी सर्वेक्षण झाले़


सात किलोमीटर मुख्य पाईपलाईन
सावळी गावासाठी गुजरी स्थित गोदावरी नदी पात्रातून सात किलोमीटर मुख्य पाईपलाईन टाकण्यात येत आहे़ गावात एक लाख ७५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले़ गोदा पात्रात भूमिगत विहीर खोदण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पाणी लागले आहे़ १०० टक्के अनुदान असलेल्या या योजनेतून गावात लहान पाईपलाईन करण्यात येणार आहे़ सध्या शेतीची कामे नसल्यामुळे मुख्य मोठी पाईपलाईनचे काम गुजरी ते सावळी करण्यात येत आहे़ इलेक्ट्रिक मोटार, पंप हाऊस, वॉचमन, विद्युत रोहित्र आदींचे या योजनेत प्रावधान आहे़ जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या देखरेखखाली काम जोरात सुरू आहेग़्रामपंचायत व पाणीपुरवठा समितीच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सरपंच सुनीता आरसे यांच्या काळात केंद्राकडून प्रशासकीय मान्यता मिळाली व अनुदान मंजूर झाले़ गाव पातळीवरची मूलभूत पाणीपुरवठा समस्या असल्याने गावकºयांनी अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून योजनेसाठी प्रयत्न चालवले़ केंद्र सरकारकडून प्रभावी पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ होय़
केंद्राच्या प्रभावी योजनेमुळे पाणीटंचाई संपुष्टात येईल -नागनाथ पाटील सावळीकर, सरपंच, सावळी़
सावळी ग्रा.पं.नेपाणीपुरवठा समिती स्थापन करून ही मुलभूत समस्या दूर केली- आबाराव संगनोड, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान समिती, सावळी़
योजनेसाठी सतत पाठपुरावा केला़ योजनेची व्याप्ती मोठी असल्याने गावात पाणी समस्या राहणार नाही -गंगाधर आरसे, माजी सरपंच

कामाची प्रगती पाहता दिवाळीपूर्वी गावकºयांना पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे़ केंद्राकडे राज्य शासनाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न कामी आले - शेख जानेमियाँ, माजी उपसरपंच, सावळी़

Web Title: The last stage of the slack water project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.