गावचे कारभारीच लोटेबहाद्दर...
By admin | Published: December 1, 2014 03:01 PM2014-12-01T15:01:34+5:302014-12-01T15:01:34+5:30
ग्रामपंचायत सदस्यांना गावाचा कारभारी म्हणून ओळखल्या जाते. मात्र या कारभार्यांकडेच शौचालय नसल्याने ग्रामस्थांना शौचालय बांधा असे सांगणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Next
ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद
अनुराग पोवळे /नांदेड
जिल्ह्यातील/ / १ हजार ११७ ग्रामपंचायत सदस्यांकडे आजघडीला शौचालय नसल्याची बाब पुढे आली आहे. ग्रामपंचायत सदस्यांना गावाचा कारभारी म्हणून ओळखल्या जाते. मात्र या कारभार्यांकडेच शौचालय नसल्याने ग्रामस्थांना शौचालय बांधा असे सांगणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी पुढाकार घेत स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यात गती दिली आहे. लोकप्रतिनिधींकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शौचालय या विषयावर जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभाही घेण्यात आली.
सभेमध्ये पाणीटंचाईमुळे शौचालय बांधकामांना अडचणी येत असल्याचा विषय पुढे आला असला तरी बहुतांश जि.प. सदस्यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. जि.प. व पं.स. स्तरावर या मोहिमेसाठी पदाधिकारी, सदस्य पुढे आले असले तरी प्रत्यक्ष ग्रामपंचायत स्तरावर मात्र या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निरुत्साह आहे. त्यासाठी शौचालय बांधकामासाठी मिळणारे अनुदान हे अग्रीम स्वरूपात मिळत नसल्याचे कारण दिले जात आहे. अग्रीम रक्कम नाही तर बांधकाम कसे करावे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शौचालय नसणार्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सर्वाधिक २५८ सदस्य हे मुखेड तालुक्यातील आहेत. मुखेड तालुक्यात ग्रामपंचायत सदस्यांची एकूण संख्याही सर्वाधिक १ हजार ४८ आहे. शौचालय नसलेल्या ग्रा.पं. सदस्यांमध्ये कंधार तालुक्यातील १६८, लोहा १२९, बिलोली ११४, हदगाव ११४, देगलूर १0८, नांदेड ७२, मुदखेड ६५, धर्माबाद ४१, अर्धापूर ३९, हिमायतनगर ३६, उमरी २७ आणि नायगाव तालुक्यातील ६ ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नाही. भोकर, किनवट आणि माहूर या तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय आहेत.
------------------
हजाराहून अधिक ग्रा.पं.सदस्यांकडे शौचालयच नाही
■ जिल्ह्यात ६३ जि.प. सदस्य आणि १२६ पंचायत समिती सदस्यांकडे शौचालय आहेत. मात्र त्याचवेळी १ हजार ११७ ग्रामपंचायत सदस्यांकडे मात्र अद्यापही शौचालय उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे.
> जिल्ह्यात एकूण १0 हजार २८७ ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यातील ९ हजार ११0 ग्रा.प. सदस्यांकडे शौचालय आहे. तर १ हजार ११७ ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालयच नाहीत
> शौचालय नसल्यास ग्रा.पं. सदस्यत्व रद्द करण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे या सदस्यांवर कारवाई होवू शकते. यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद