लेटलतीफ गुरूजींना सीईओंचा दणका, पाच शिक्षकांचे निलंबन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 06:08 PM2021-07-16T18:08:48+5:302021-07-16T18:10:04+5:30

Nanded ZP School News : जिल्ह्यातील तब्बल ३९० माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असून शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीचे आदेश आहेत.

Latelatif five Guruji suspended by Nanded ZP CEOs Varsha Thakur Ghuge | लेटलतीफ गुरूजींना सीईओंचा दणका, पाच शिक्षकांचे निलंबन 

लेटलतीफ गुरूजींना सीईओंचा दणका, पाच शिक्षकांचे निलंबन 

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यापनातून गुणवत्ता वाढविण्याच्या सूचना

नांदेड : तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी शाळेच्या दुसऱ्याच दिवशी वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांनाशाळेच्या दुसऱ्याच दिवशी वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांना दणका दिला आहे. भोकर येथील लेटलतीफ पाच गुरूजींना निलंबित केले. या कारवाईमुळे मात्र शाळांची घंटा वाजण्यापूर्वीच शिक्षक शाळांच्या मैदानात हजर राहतील, अशी अपेक्षा आहे. ( Nanded ZP's CEO suspends five teachers )

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून शाळांची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले होते. दरम्यान, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३९० माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असून शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीचे आदेश आहेत. त्यात प्रत्येक शिक्षकांची कोरोना तपासणी करणेही गरजेचे आहे. कोविडमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याची ही संधी असून प्रत्येक शिक्षकांनी स्वयंस्फुर्तपणे विद्यार्जनाचे काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. ठाकूर यांनी शुक्रवारी पाच ते सहा शाळांना भेट देवून तेथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाच शिक्षकांचे निलंबन 
भोकर तालुक्यात दौऱ्यावर असताना एका शाळेत पन्नास टक्केपेक्षाही कमी शिक्षक उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी तत्काळ पाच शिक्षकांचे निलंबन केले. या कारवाईमुळे लेटलतीफ शिक्षकांना चपराक बसणार आहे. शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी कठोर परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Latelatif five Guruji suspended by Nanded ZP CEOs Varsha Thakur Ghuge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.