ऊस गाळपात लातूर, परभणीची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:16 AM2021-02-07T04:16:59+5:302021-02-07T04:16:59+5:30
नांदेड जिल्ह्यातील सहा कारखान्यांकडून १० लाख ७३ हजार ५९५ टन उसाचे गाळप झाले असून १० लाख २७ हजार ९४० ...
नांदेड जिल्ह्यातील सहा कारखान्यांकडून १० लाख ७३ हजार ५९५ टन उसाचे गाळप झाले असून १० लाख २७ हजार ९४० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात सात कारखाने गाळप घेत असून या कारखान्यांनी १७ लाख ४० हजार १२० टन उसाचे गाळप केले असून १६ लाख ७३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. परभणी जिल्ह्यात सहा साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. या कारखान्यांनी १४ लाख ७२ हजार ९०२ टन उसाचे गाळप केले असून १४ लाख ८ हजार ८४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडून ८ लाख, ६७ हजार ४३३ टन उसाचे गाळप करण्यात आले असून ८ लाख ७५ हजार १३० टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.