मागासवर्गीयांच्या निधीसाठी आंध्र प्रदेशाप्रमाणे कायदा आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:06+5:302020-12-26T04:14:06+5:30
मागासवर्गीयांच्या निधीचा योग्य वापर व्हावा तसेच तो निधी इतरत्र वर्ग होऊ नये यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट ...
मागासवर्गीयांच्या निधीचा योग्य वापर व्हावा तसेच तो निधी इतरत्र वर्ग होऊ नये यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले. मागील दहा महिन्यात सरकारने मागासवर्गीय समाजासाठी असलेला मोठा निधी इतरत्र वर्ग केला. एकट्या सामाजिक न्याय विभागाचा कोट्यवधीचा निधी इतरत्र गेल्याने या विभागाच्या सर्व योजना ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे हा निधी वळविता येऊ नये यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर कायदा आणण्याचे विचाराधीन असून यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मसुदा सुपुर्द करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिलोली येथील मूकबधिर तरुणीचे खून प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणातील खऱ्या आरोपींना शोधून त्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्याचेही हंडोरे यांनी यावेळी सांगितले.
चौकट...........
काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेचे स्वागत....
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काँग्रेसचे नूतन मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढेल असे वक्तव्य केले आहे. जगताप यांच्या या घोषणेचे चंद्रकांत हंडोरे यांनीही जोरदार समर्थन केले. मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. महानगरपालिका निवडणुकीत ती दिसून येईल असे सांगत जनता केंद्रातील भाजपाच्या सरकारवर नाराज असल्याचेही हंडोरे यावेळी म्हणाले.