न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत वकिलाचा कोर्टासमोर आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 12:57 PM2022-03-12T12:57:33+5:302022-03-12T12:58:32+5:30

पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी वकिलास लगेच पकडल्याने अनर्थ टळला

Lawyer attempts suicide in court, alleging contempt by judge in court | न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत वकिलाचा कोर्टासमोर आत्महत्येचा प्रयत्न

न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत वकिलाचा कोर्टासमोर आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

नांदेड: न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत एका वकिलाने न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच वकिलाला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली.

जयपाल ढवळे असे वकिलाचे नाव आहे. त्यांच्या अशीलाचा खटला न्या बांगर यांच्या कौर्टात होता. परंतु बांगर यांच्याकडून वकिलांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करीत ढवळे यांनी सकाळी अंगावर पेट्रोल ओतले. यावेळी वजीराबादच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी लगेच त्यांना पकडले. त्यानंतर त्यांना ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तुरुंगात असलेल्या बिगानिया टोळीने आमचा खटला बांगर यांच्यासमोर न चालवता इतर कोणत्याही न्यायाधीशासमोर चालवावा या मागणीसाठी तुरुंगात उपोषण केले होते.

 

Web Title: Lawyer attempts suicide in court, alleging contempt by judge in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.