लक्ष्मीकांत चन्नावार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:18 AM2021-04-01T04:18:58+5:302021-04-01T04:18:58+5:30
राजाभाऊ दौलतकार नांदेड : शहरातील आर.के. बिल्डर्सचे कर्मचारी राजाभाऊ नीळकंठराव दौलतकार (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने २९ मार्च रोजी ...
राजाभाऊ दौलतकार
नांदेड : शहरातील आर.के. बिल्डर्सचे कर्मचारी राजाभाऊ नीळकंठराव दौलतकार (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने २९ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी ३० मार्च रोजी सायंकाळी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. गत ८ वर्षांपासून ते आर.के. बिल्डर्स रेणापूरकर यांच्याकडे नोकरीस होते.
सुशीलाबाई लाठकर
नांदेड : हडकोतील रहिवासी सुशीलाबाई गणेशराव लाठकर (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर हडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात ५ मुले, ३ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माला, बेला, बुडगा, जंगम समाज संघटनेचे अध्यक्ष गणेशराव लाठकर यांच्या त्या पत्नी होत.
विजयालक्ष्मी कानडे
नांदेड : शहरातील श्रीनगरमधील रहिवासी श्रीमती विजयालक्ष्मी सोमनाथ कानडे (वय ६४)यांचे रविवारी २८ मार्च रोजी अल्पशा आजाराने हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, ३ मुली असा परिवार आहे. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य गजानन कानडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
फोटो आहे
गणपतराव कदम
नांदेड : वैशालीनगर येथील रहिवासी व पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले गणपतराव नरहरी कदम (वय ७५) यांचे ३० मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
हरिसिंघ शिलेदार
शहरातील रहिवासी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सरदार हरिसिंघ नानूसिंघ शिलेदार यांचे ३० मार्च रोजी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, २ मुली, ३ मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नगिनाघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवाकाळात त्यांनी बाहेर राज्यातून अतिरेकी पकडून नांदेडला आणले होते.
हौसाजी कुपटीकर
नांदेड : पंकज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा पंचशील विद्यालय नांदेडचे माजी मुख्याध्यापक एच.जी. कुपटीकर यांचे २९ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर ३० रोजी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सहयोगनगर येथील महात्मा कबीर माध्यमिक व अशोक प्राथमिक शाळेचे ते संस्थाचालक होते. त्यांच्यापश्चात पत्नी, २ मुली, जावई, मुलगा, नात असा परिवार आहे. कराटे प्रशिक्षक प्रवीणकुमार कुपटीकर यांचे ते वडील होत.
मारुती डाखोरे
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसाटी संचलित यशवंत महाविद्यालयातील गणित विभागात कार्यरत प्रयोगशाळा परिचर मारुती एस. डाखोरे (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी मारुती डाखोरे यांनी महाविद्यालयाच्या सर्व उपक्रमांचे उत्कृष्ट छायाचित्रण केले असून, त्यांनी आपली सेवा प्रामाणिक व चोखपणे बजावली आहे, अशी भावना व्यक्त केली. ते मूळचे कंधार तालुक्यातील पेठवडजचे रहिवासी होत.
गंगाधर कोमवाड
नांदेड पोलीस दलातील सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक गंगाधर भीमराव कोमवाड (वय ७३) यांचे २९ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, जावई, सुना, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
फोटो आहे
प्रा.उत्तम गायकवाड यांचे निधन
नांदेड : नवीन नांदेड भागातील शाहूनगर, वाघाळा येथील रहिवासी आणि वसंतराव नाईक महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.उत्तम मोहनराव गायकवाड-हातराळकर (वय-५९) यांचे अल्पशा आजाराने २८ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर नांदेड येथे अंंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, भावजय, एक बहीण, मेहुणा व दत्तकपुत्र असा परिवार आहे.