जिल्ह्यात कोरोना बळी थांबेनात, शनिवारी पुन्हा २६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:37+5:302021-04-04T04:18:37+5:30
शनिवारी ४ हजार २६६ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील २ हजार ९७६ अहवाल निगेटिव्ह आले तर १ हजार २०७ ...
शनिवारी ४ हजार २६६ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील २ हजार ९७६ अहवाल निगेटिव्ह आले तर १ हजार २०७ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ४६ हजार ४८३ इतकी झाली आहे. तर कोरोनाचे एकूण बळी ८६९ इतके झाले आहेत.
शनिवारच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीत मनपा हद्दीत २३५, नांदेड ग्रामीण २२. अर्धापूर १, भोकर ४. बिलोली १. हदगाव १५, हिमायतनगर २७, कंधार १०, किनवट ३३, लोहा ३४, माहूर १, मुखेड १५, नायगाव २७, मुदखेड ३८, हिंगोली १ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एक रुग्ण आढळला. ॲन्टीजेन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्रात ३१२, नांदेड ग्रामीण १३, अर्धापूर ३३, भोकर १८, बिलोली २५, देगलूर ४६, धर्माबाद ८, हिमायतनगर ४, कंधार २२, किनवट ३४, लोहा २५, माहूर १३, हदगाव १२, परभणी ४ आणि लातूर जिल्ह्यातील ३ रुग्ण बाधित आढळले आहेत.
मयतामध्ये सिद्धनाथपुरी येथील ४४ वर्षीय पुरुष, लोहा येथील ६२ वर्षीय महिला, सिडको येथील ८० वर्षीय महिला, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील ६२ वर्षीय महिला, नांदेडमधील सिद्धांतनगर येथील ६२ वर्षीय महिला, नांदेड गुरुद्वारा परिसरातील ६३ वर्षीय महिला, मुखेडमधील ८० वर्षीय महिला, उमरी येथील ६८ वर्षीय पुरुष, हनुमानगड येथील १९ वर्षीय महिला आणि ७४ वर्षीय पुरुष, नांदेडमधील पवननगर येथील ६१ वर्षीय महिला, जैन मंदिर परिसरातील ५५ वर्षीय महिला, अर्धापूर तालुक्यातील लहान येथील ५५ वर्षी महिला, अर्धापूर येथील ५१ वर्षीय पुरुष, नांदेडमधील विनायकनगर येथील ६४ वर्षीय महिला, हदगाव येथील ६७ वर्षीय पुरुष, नांदेडमधील साईबाबानगर येथे ६२ वर्षीय पुरुष, बालाजीनगरातील ६८ वर्षीय महिला, बजाज कॉम्प्लेक्समधील ६० वर्षीय पुरुष, अर्धापूर तालुक्यातील मालेगावमधील ६५ वर्षीय पुरुष, नांदेडमधील सराफा भागातील ४२ वर्षीय महिला, कैलासनगरातील ६० वर्षीय महिला, हदगाव तालुक्यातील रहाटी चौकातील ६० वर्षीय महिला, हदगावमधील ७० वर्षीय पुरुष, मुखेड येथील ६७ वर्षीय पुरुष आणि नांदेडमधील चौफाळा भागातील ४६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात शनिवारी १ हजार १३ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६, मनपा अंतर्गत ६९७, किनवट ९, बिलोली १७, नायगाव १४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १४, उमरी १७, मुखेड ५४, अर्धापूर १०, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १६, हदगाव १७, भोकर ५९, माहूर ४ आणि खासगी रुग्णालयातील ११२ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या १० हजार ७२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील १५३ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये १०२. जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत २००, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १३०, किनवट कोविड रुग्णालयात १४१, मुखेड २६६, नायगाव ९४, उमरी ३७, माहूर १८, भोकर २३, हदगाव ३३. हदगाव कोविड केअर सेंटर ६७, लोहा १२६, कंधार ३७, महसूल कोविड केअर सेंटर २००, हिमायतनगर ७, धर्माबाद ३३, मुदखेड ११, अर्धापूर २५, बारड १२, मांडवी ३ आणि खासगी रुग्णालयात ९६२ रुग्ण उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात मनपा अंतर्गत ५ हजार ८३८ तर विविध तालुक्यांतर्गत १ हजार ७८२ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.