माणसे कमी अन् कामाचा व्याप जास्त, जात पडताळणीच्या कामाचा बोजा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:17 AM2021-02-10T04:17:51+5:302021-02-10T04:17:51+5:30

----------------------- नांदेड : ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार व विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी कार्यालयात अपुरे मनुष्यबळ उपलब्ध असल्याने ...

The less the number of people, the more the workload increased | माणसे कमी अन् कामाचा व्याप जास्त, जात पडताळणीच्या कामाचा बोजा वाढला

माणसे कमी अन् कामाचा व्याप जास्त, जात पडताळणीच्या कामाचा बोजा वाढला

Next

-----------------------

नांदेड : ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार व विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी कार्यालयात अपुरे मनुष्यबळ उपलब्ध असल्याने कामाचा व्याप जास्त वाढला आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या वितरणास विलंब होत आहे. नांदेड येथील जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात दररोज साधारणपणे शंभर प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यानुसार महिन्याभरात अडीच ते तीन हजार प्रस्ताव दाखल होत आहेत. या प्रस्तावाच्या संदर्भाने कामाचे नियोजन केले जात असले तरी कार्यालयात उपलब्ध मनुष्यबळ अपुरे आहे .त्यामुळे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रस्ताव दाखल करण्याचे प्रमाण अधिक होते. तसेच बारावीतील विद्यार्थ्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दाखल करण्याची घाई सुरू होती. अशावेळी कार्यालयात प्रस्ताव दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. या ठिकाणी अक्षरश: रांगा लावल्या होत्या. यावेळी समतादूतांची मदत कार्यालयाने घेतली होती; परंतु तरीही कामाचा निपटारा होण्यास विलंब होत असल्याचे प्रस्ताव दाखल करणार यांनी सांगितले.

चौकट- सध्या जात पडताळणी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांची सात व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सात असे १४ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. या कार्यालयात १० शासकीय पदे मंजूर असून, त्यापैकी सात पदे भरण्यात आली आहेत, तर तीन जागा रिक्त आहेत .शासनाने ब्रिक या कंपनीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम सोपविले आहे. या कंपनीकडून सात पदे भरण्यात आली आहेत. या कार्यालयात विधी अधिकारी, व्यवस्थापक, संशोधक सहायक, प्रकल्प सहायक ,कार्यालय सहायक अशी पदे कार्यरत आहेत.

चौकट- प्रस्ताव निकाली काढण्यासाठी लागतो

तीन महिन्यांचा कालावधी

- जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात सादर केलेला प्रस्ताव निकाली काढण्यासाठी साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, अनेक वेळा अर्जात त्रुटी असल्यामुळे प्रस्ताव निकाली काढण्यास विलंब होतो. जर संबंधितांनी प्रस्ताव परिपूर्ण दिला असेल, तर त्यास जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कार्यालयातून साधारणपणे तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र दिले जाते.

कोट- अधिकाऱ्याचे कोट

--------

नांदेड येथील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात मनुष्यबळ पाहिजे तेवढे उपलब्ध आहे. या ठिकाणी प्रस्ताव दाखल करण्याचे प्रमाण अधिक असले तरी ते निकाली काढण्यासाठी उपलब्ध कर्मचारी तत्पर आहेत. तसेच प्रस्ताव निकाली काढण्यासाठी योग्य नियोजन केले जाते. - शेंदारकर, उपायुक्त,

जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय, नांदेड

कोट-

नोकरीच्या ठिकाणी दाखल करण्यासाठी काढाव्या लागत असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्राचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपूर्वी कार्यालयात दाखल केला होता; परंतु विविध कारणाने पडताळणी प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झाले नाही. या संदर्भात विचारणा केल्यास या आठवड्यात करू, पुढच्या आठवड्यात करू, असे उत्तर दिले जाते. - बी. एस. साकरे, नांदेड

आकडे-

रोज दाखल होणारी प्रकरणे - ३५०,

एका महिन्यात दाखल प्रकरणे - ३८००

रोज निकाली निघणारी प्रकरणे - १००

Web Title: The less the number of people, the more the workload increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.