पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:19 AM2019-04-11T00:19:33+5:302019-04-11T00:20:03+5:30
शेतीच्या कामासाठी माहेराहून २० हजार रुपये आण म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देवून पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी बुधवारी सुनावली.
भोकर : शेतीच्या कामासाठी माहेराहून २० हजार रुपये आण म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देवून पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी बुधवारी सुनावली.
हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी गावाच्या शिवारातील आखाड्यावर यातील आरोपी रामदास काशिबा ढाले पत्नी सवितासह रहात होता.
दरम्यान माहेराहून शेतीच्या कामासाठी २० हजार रुपये आण म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देवून आरोपी रामदास ढाले याने पत्नी सविताचा रात्रीच्या वेळी गळा दाबून खुन केला.
याबाबत मयताचे वडीलांनी हिमायतनगर पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून ३ सप्टेंबर २०१७ रोजी आरोपी रामदास ढाले, काशिबा ढाले, साखराबाई ढाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचा तत्कालीन पोउपनि. नितीन गायकवाड यांनी तपास करुन आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात येवून न्यायालयाने साक्षपुराव्यावरुन व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी रामदास काशिबा ढाले यास जन्मठेप व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. रमेश राजूरकर यांनी काम पाहिले.