पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

By Admin | Published: December 1, 2014 03:04 PM2014-12-01T15:04:40+5:302014-12-01T15:04:40+5:30

पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे.

Lift of millions in water supply scheme | पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

googlenewsNext

 

नांदेड: राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत नांदेड तालुक्यातील मौजे वानेगाव, वरखेड, भानपूर येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे. 
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत मौजे वानेगाव-वरखेड-भानपूर ता. नांदेड ही पाणी पुरवठा योजना वर्षे २0१२-१३ मध्ये मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये विहीर, स्वीचरूम, पंपीग मशीनरी, उद्धरण नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. निविदेनुसार सर्व कामे १८ महिन्यात पुर्ण करण्याचे बंधनकारक आहे. परंतु, २0 महिन्यांचा कालावधीत केवळ ३0 टक्के काम पुर्ण झाले आहे. 
सद्यस्थितीत काम बंद असल्याने गावकर्‍यांच्या तक्रारीवरून उप कार्यकारी अभियंता (पापु) जिल्हा परिषद यांच्या मार्फत सदरील कामाची चौकशी केली असता नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. उप कार्यकारी अभियंता यांच्या अहवालानुसार ठेकेदारामार्फत झालेल्या कामांचे मुल्यांकन करून पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या मागणीनुसार दोन टप्प्यात दहा लाख रूपये देण्यात आले आहेत. दरम्यान, १ लाख ३१ हजार ९५५ अद्याप ग्रामपंचायतीने समितीच्या खात्यावर वर्ग केलेले नाहीत तसेच समितीने लोकवर्गणीची रक्कम २ लाख रूपये सदर खात्यावर भरणा केली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 
बँकेतील आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे करणे बंधनकारक असतानाही समितीने विनापरवानगी शिफारस पत्र न घेता नगदी स्वरूपात व्यवहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. समितीने गुत्तेदाराला धनादेशानूसार ६ लाख रूपये दिलेले आहेत. मोजमाप पुस्तीकेच्या नोंदीप्रमाणे आजपर्यंत झालेल्या कामांचे मुल्यांकन १३ लाख ८४४ रूपये होत आहे. 
पाणीपुरवठा समितीने खात्यावरील रक्कम उचलून ती गुत्तेदारास न दिल्यामुळे गत सहा महिन्यापासून काम बंद असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली आहे. तसेच १0 टक्के लोकवाटा न भरता भरला असल्याचे हमीपत्र देवून समितीने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
 
गावकर्‍यांची कारवाईची मागणी...
 
■ वानेगाव, वरखेड, भानपूर येथील गावकर्‍यांना सदरील योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा होती. परंतु, पाणी पुरवठा समितीने केलेल्या नियमबाह्य आर्थिक व्यवहार आणि अपहारामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पडले आहे. अपहार करणार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे. 

Web Title: Lift of millions in water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.