भाऊराव चव्हाण साखर कारखान्याला सहा कोटींचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:35+5:302021-09-02T04:39:35+5:30
भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक ३ हदगाव आणि युनिट क्रमांक ४ वाघलवाडा साखर यांच्या साखर विक्रीचे टेंडर चेन्नई ...
भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक ३ हदगाव आणि युनिट क्रमांक ४ वाघलवाडा साखर यांच्या साखर विक्रीचे टेंडर चेन्नई येथील एका कंपनीला दिले होते. साखर निर्यात केल्यानंतर भाऊराव चव्हाण साखर कारखान्याला केंद्र शासनाकडून प्रतिटन आर्थिक मदत मिळते. परंतु संबंधित कंपनीने निर्यात केलेली कुठलीही कागदपत्रे न सादर करता इंडाेनेशिया या देशाने तुमची साखर नाकारल्याचा ई-मेल पाठविला. त्यामुळे केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर टाच आली आहे. या व्यवहारात कारखान्याची पाच कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले. बारड पोलिसांनी या प्रकरणात चेन्नईतील प्रदीपराज चंद्राबाबू, अहमदनगरच्या रुही येथील अभिजित देशमुख आणि इंडिगा मणी कांता यांना अटक केली आहे. या प्रकरणात २ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.