विहिरीत पडलेल्या रोहीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:30 AM2018-03-15T00:30:09+5:302018-03-15T00:31:02+5:30

अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकास विहिरीत पडलेल्या रोहीच्या एक वर्षीय पिल्ल्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना पिल्लू विहिरीत पडले होते. ही घटना १४ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान अंबाडी शिवारात घडली.

Lived in the well in the well | विहिरीत पडलेल्या रोहीला जीवदान

विहिरीत पडलेल्या रोहीला जीवदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकास विहिरीत पडलेल्या रोहीच्या एक वर्षीय पिल्ल्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना पिल्लू विहिरीत पडले होते. ही घटना १४ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान अंबाडी शिवारात घडली.
अत्यल्प पाऊस पडल्याने जंगल शिवारात पशू, पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले. परिणामी पाण्याच्या शोधार्थ प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. रोहीच्या पिल्लाबाबतही असेच घडले. १३ मार्च रोजी एक वर्षीय पिल्लू पाण्याच्या शोधार्थ अंबाडी शिवारातील शेत सर्व्हे २२७ मधील गंगूबाई संदूलवार यांच्या शेतात पोहोचले. पहाटे ५ वाजेच्या दरम्यान विहिरीत पिल्लू पडले असावे. सकाळी नेहमीप्रमाणे व्यंकटी संदूलवार शेतात गेले असता, विहिरीतील पिल्लू त्यांच्या दृष्टीस पडले. विहिरीतील पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करुन घटनेची माहिती बीटच्या वनरक्षक मिमीरा टोंपे यांना दिली.
सहाय्यक वनसंरक्षक डॉ़ राजेंद्र नाळे, वनपरिक्षेत्राधिकारी के़एऩ कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाडी बिटाचे वनपाल शेख फरीद, वन्यजीव विभागाचे वनपाल एस़बी़ सालमेटी, वनरक्षक मीरा टोंपे, वनरक्षक आरक़े़ साबणे, जी़बी़ ढवरे, कोमल मºहसकोल्हे, चालक अनिल लखाडे, भगवान वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने बाजेच्या सहाय्याने पिल्लाला विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर जाळीच्या सहाय्याने अवघ्या १५ मिनिटांतच म्हणजे सकाळी ९.३० च्या दरम्यान बाहेर काढून त्याच्यावर पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत उपचार करून भीमपूर पठारावर जंगलाच्या दिशेने सोडून दिले़ जिवाच्या आकांताने जंगलाच्या दिशेने व रोहीच्या कळपाच्या दिशेने पिल्लाने धूम ठोकली़ किनवट तालुक्यातील जंगलात पानवठ्याची सोय नसल्याने प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.
शासनाकडून पानवठ्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे समजते. यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करुन निधीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत वनप्रेमींनी व्यक्त केले.

Web Title: Lived in the well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.