तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी

By शिवराज बिचेवार | Published: August 22, 2023 04:40 PM2023-08-22T16:40:35+5:302023-08-22T16:40:53+5:30

खंडणी दिली नाही तर जमिन जप्त करायला लावू, अशी धमकी शेतकऱ्यास देण्यात आली

loan was placed on the farmer's land by complaining, now demand for ransom to remove it | तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी

तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी

googlenewsNext

नांदेड- नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील एका शेतकर्याच्या शेत जमिनीबाबत तहसिलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करुन जमिनीवर बोजा चढविण्यात आला. त्यानंतर हा बोजा काढून घेण्यासाठी दोन लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली.

या प्रकरणात नायगाव पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.सुभाष गंगाराव नव्हारे यांच्या जमिनीबाबत राजरत्न सटवाजी ढुमणे याने तहसिलदारांकडे तक्रार केल्या होत्या. त्यानंतर तहसिलदारांच्या आदेशाने नव्हारे यांच्या जमिनीवर बोजा चढविण्यात आला. हा बोजा काढून घेण्यासाठी ढुमणे याने सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या समोर नव्हारे यांना दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली.

खंडणी दिली नाही तर जमिन जप्त करायला लावून जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिली. या प्रकरणात सुभाष नव्हारे यांच्या तक्रारीवरुन राजरत्न ढुमणे याच्या विरोधात पाेलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास पोउपनि बाचावार हे करीत आहेत.

Web Title: loan was placed on the farmer's land by complaining, now demand for ransom to remove it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.