आजपासून लोकसभेची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:15 AM2019-03-19T01:15:20+5:302019-03-19T01:17:27+5:30

नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला १९ मार्चपासून प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेने प्रारंभ होणार आहे. १९ मार्चपासूनच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

Loksabha rally from today | आजपासून लोकसभेची रणधुमाळी

आजपासून लोकसभेची रणधुमाळी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा सज्ज १९ ते २७ मार्चपर्यंत दाखल करता येणार उमेदवारी अर्ज

नांदेड: नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला १९ मार्चपासून प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेने प्रारंभ होणार आहे. १९ मार्चपासूनच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्याही दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यांना आचारसंहितेबाबत माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना ७० लाखांची खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज १९ मार्चपासून २७ मार्चपर्यंत भरता येणार आहेत. या कालावधीत महापालिका कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता वाहतुकीसाठी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक सुरेंद्र नाथा हे १९ मार्च रोजी नांदेडमध्ये दाखल होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात काही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. भोकर तालुक्यातील दिवशी आणि माहूर तालुक्यातील लिंगायत नेर येथील ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. संबंधित तहसीलदार गावकऱ्यांशी चर्चा करीत असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. त्याचवेळी निवडणूकविषयक प्रशिक्षणही देण्यात येत आहे. पहिले प्रशिक्षण २४ मार्च रोजी होणार असल्याचे आहे़ मतदान यंत्रामधील होणारा बिघाड लक्षात घेता कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येत आहे. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघातील निवडणूक कर्मचाºयांना २५ आणि २६ मार्च रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भरारी पथके, क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख यांनाही प्रशिक्षण दिले जात असल्याचेही परदेशी म्हणाले. प्रारंभी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी प्रास्ताविकात उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी आचारसंहिता नियमाबाबत शंका, अडचणी असल्यास निवडणूक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
दुपारी तीन पूर्वी दाखल करावे लागणार अर्ज
लोकसभा निवडणुकीत शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत जितके अर्ज जिल्हा निवडणूक अधिका-यांकडे सादर केले जातील, तेच अर्ज वैध ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले. जालना येथील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने वेळेच्या नियमाबाबत स्पष्टता केली आहे. उमेदवारी अर्ज तीन वाजेपर्यंत निवडणूक अधिकाºयांकडे सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कक्षात असूनही तीन वाजेपूर्वी अर्ज सादर न झाल्यास तो वैध मानला जाणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना वेळेच्या आत आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत.

Web Title: Loksabha rally from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.