देगलूर तालुक्यात प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:32+5:302021-07-08T04:13:32+5:30

अध्यक्षपदी राजेश झगडे उमरी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्वलदरी केंद्र गोरठाअंतर्गत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक झाली. यावेळी ...

Looting of passengers in Deglur taluka | देगलूर तालुक्यात प्रवाशांची लूट

देगलूर तालुक्यात प्रवाशांची लूट

Next

अध्यक्षपदी राजेश झगडे

उमरी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्वलदरी केंद्र गोरठाअंतर्गत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदी राजेश झगडे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी रामेश्वर तेलंगवाड यांची निवड झाली. यावेळी मुख्याध्यापक बालाजी पंतोजी, प्रदीप जोंधळे, रावसाहेब पचलिंग, पुंडलिक राठोड, मधुकरराव पचलिंग, बालाजी पचलिंग आदी उपस्थित होते.

भाजपच्या वतीने निषेध

उमरी : विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या प्रकाराचा उमरी येथे भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला. जिल्हा बँकेचे संचालक कैलास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष विष्णू पंडित, तालुका सरचिटणीस गजानन श्रीरामवार, संचालक राजू पाटील, गंगाधरराव चिंताके, अमित पटकुटवार, सोमनाथ हेमके, गणेश पगलवाड, पांडू गळगे, प्रणिता जोशी, राणी कोटेवार, वंदना माळवतकर उपस्थित होत्या.

शिनगारे यांना सत्कार

अर्धापूर : येथील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मार्गलिपिक बालाजीराव शिनगारे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी सहायक कार्यकारी अभियंता विशाल चोपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाखा अभियंता राजेंद्र बिराजदार, ए.एम. लोणे, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, शहराध्यक्ष राजेश्वर शेट्टे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ कदम, प्रवीण देशमुख, डॉ. विशाल लंगडे, आर.आर. देशमुख, नीळकंठ मदने, लक्ष्मीकांत मुळे आदी उपस्थित होते.

नाईक जयंतीनिमित्त वृक्षारोपण

देगलूर : हरीत क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शिळवणी ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच मनोहरराव देशमुख, प्रताप देशमुख, ओमप्रकाश देशमुख, उपसरपंच नागनाथ देवकत्ते, सदस्य अनिल राठोड, ग्रामसेवक गोविंद वरकड, तानाजी डोमाटे, डॉ. गौतम कांबळे आदी उपस्थित होते.

कोरोना योद्ध्यांचा सत्कार

माळाकोळी : कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा माळाकोळी येथे प्रहारच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच निवृत्त सुभेदार संतराम केंद्रे यांचाही सत्कार झाला. तालुकाप्रमुख माऊली गीते यांनी हा कार्यक्रम घेतला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके, माधव बेटकर, माऊली गीते, भाऊ वाडेकर, सूर्यकांत पांचाळ, चांदपाशा शेख, गोविंद पाटील, बाळासाहेब शिंदे, सुभाष केंद्रे, जगन्नाथ तिडके आदी उपस्थित होते.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

किनवट : किनवट तालुक्यातील वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून शेतीचे अमाप नुकसान करणे सुरू केले आहे. वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके हातची जातात की काय अशी परिस्थिती असताना वन्य प्राणी आहेत ती पिके नष्ट करीत आहेत. या प्रकाराला शेतकरी वैतागले आहेत.

सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव

नायगाव : तालुक्यात काही भागात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी यावेळी सोयाबीन, उडीद, मूग, तुरीची पेरणी केली. मात्र या पिकांवर आता नागवाणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

बँकेतील कामे खोळंबली

बिलोली : रामतीर्थ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील व्यवस्थापकाची बदली झाली. त्या ठिकाणी अजून कोणी रुजू न झाल्याने बँकेची कामे खोळंबली आहेत. नवीन शाखा व्यवस्थापकाची तत्काळ नेमणूक करावी अशी मागणी होत आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात हिप्परगा, किनाळा, रामतीर्थ, डोणगाव बु., डोणगाव खु., जिगळा, कामरसपल्ली, केरूर, बिजूर, आदमपूर, बोरगाव, आळंदी, भोपाळा, टाकळी, शेळगाव, धुप्पा, कुंचेली आदी गावे येतात.

कार्याध्यक्षपदी सुवर्णकार

मुक्रमाबाद : येथील व्यंकट सुवर्णकार यांची पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली. संघटनेचे राज्याध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी ही निवड केली. यावेळी खंडेराव बकाल पाटील, मारोतराव कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. नूतन कार्याध्यक्षांचे अनेकांनी स्वागत केले.

जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट

भोकर : येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी भेट देऊन सर्व विभागांची पाहणी केली. यावेळी अशोक मुंडे, श्रीमती शुभदा गोसावी, डॉ. माधव विभुते, डॉ. राजाराम कोळेकर, डॉ. सागर रेड्डी, डॉ. अनंत चव्हाण, डॉ. सारिका जेवळीकर, सत्यजीत टिप्रेसवार, वैशाली कुलकर्णी, अभिनंदन पांचाळ, विठ्ठल शेळके, संदीप ठाकूर, मल्हार मोरे, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे, सुरेश डुम्मलवार, संतोष मामीडवार, बबबू चरण आदी उपस्थित होते.

आदर्श विद्यालयात वृक्षारोपण

हदगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते आदर्श विद्यालय मनाठा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी के.व्ही. फोले, बालाजी तोरणेकर, दयानंद कोंजीवाले आदी उपस्थित होते.

मेळगावचे सरपंच अपात्र

नायगाव : बलात्कार प्रकरणात जेलमध्ये असलेले मेळगावचे सरपंच व अतिक्रमण केल्या प्रकरणी एका महिला सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ५ जुलै रोजी अपात्र ठरवले. अमाेल महिपाळे असे सरपंचाचे नाव असून चंद्रकला धसाडे असे महिला सदस्याचे नाव आहे. दोघांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली.

आठवडी बाजारात भाजीपाला महागला

मांडवी : मागील १५ दिवसांपासून मांडवी परिसरात पावसाने दडी मारल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. पावसाअभावी हिरवा भाजीपाला टिकवून ठेवणे अवघड बनले. मांडवी बाजारात हिरव्या मिरचीचा भाव प्रतिकिलो १२० रुपये, कारले ८० रुपये, टोमॅटो ५० रुपये किलो असे दर होते.

धानोऱ्यात वृक्षारोपण

माहूर : तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी राजेंद्र रोटे, मुख्याध्यापक सुरेश मोकले, सहशिक्षक सुदाम राठोड, पोलीस पाटील बालाजी कवाने यांची उपस्थिती होती. अनंतवाडी केंद्रांतर्गत करतारसिंग तांडा, दिगडी, साकूर आदी शाळांमध्येही वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Looting of passengers in Deglur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.