शेतकरी संघटनेच्या वतीने हदगाव येथे महाचर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:40+5:302021-01-08T04:54:40+5:30

या चर्चासत्रात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी कुलगुरू डॉ. ...

Mahacharchasatra at Hadgaon on behalf of the Farmers Association | शेतकरी संघटनेच्या वतीने हदगाव येथे महाचर्चासत्र

शेतकरी संघटनेच्या वतीने हदगाव येथे महाचर्चासत्र

Next

या चर्चासत्रात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त माई, प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव, प्रदेश अध्यक्ष ॲड. दिनेश शर्मा, माजी आ. ॲड. वामनराव चटप, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, आ. राम पाटील रातोळीकर, शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागप्रमुख सुधीर बिंदू, बीटी बियाणे तंत्रज्ञान प्रणेते ललित बहाळे, उद्योजक विजय नेवल, महिला नेत्या सीमाताई नरोडे, हवामान अभ्यासक पंजाबराव पाटील डख, स्वभाप जिल्हाध्यक्ष ॲड. धोंडीबा पवार आदी मार्गदर्शन करून चर्चेत सहभागी होणार आहेत.

भाजप सरकारने केंद्रातील नवीन शेतीविषयक तीन कायदे संसदेत व राज्यसभेत पारित केले. कायदा लागू करू नये, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असे सर्व विरोधी पक्षांना वाटते. परंतु केंद्र सरकारने हे कायदे रद्द करता येणार नाहीत. शक्य तर शेतकऱ्यांशी चर्चा करून बदल करता येतील. काही सुधारणा करता येतील अशी भूमिका घेतलेली असताना संपूर्ण देशात सरकारच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कधी नव्हे तो शहरी व नोकरदारवर्ग शेतकऱ्यांच्या बाजूने उभा टाकल्याचे दिसून येत आहे. परंतु हे कायदे नेमके काय म्हणतात? कायद्यात काय तरतुदी आहेत, त्याचा शेतकऱ्यांच्या व्यवसायावर व जीवनावर काय परिणाम होईल? विरोधकांनी आरोप केल्याप्रमाणे खरेच उद्योगपती शेतकऱ्यांना लुटतील का? याविषयी सर्वच नागरिकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. त्यासाठी या कायद्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा घडवून यावी म्हणून हदगांव तालुका शेतकरी संघटनेने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली.

Web Title: Mahacharchasatra at Hadgaon on behalf of the Farmers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.