बिलोली येथील बलात्कार व खुनाच्या निषेधार्थ नांदेडात २१ रोजी महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:59+5:302020-12-17T04:42:59+5:30
बिलोली तालुक्यात मागील काही वर्षात आपल्या महिला, मुलींवरील अत्याचाराची मालिकाच सुरु आहे. यापूर्वीच्या प्रकरणातही विराट मोर्चे काढले. आता परत ...
बिलोली तालुक्यात मागील काही वर्षात आपल्या महिला, मुलींवरील अत्याचाराची मालिकाच सुरु आहे. यापूर्वीच्या प्रकरणातही विराट मोर्चे काढले. आता परत या दुर्दैवी घटनेमुळे मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. संशयित आरोपी म्हणून एकाला अटक करुन अत्यंत थातूरमातूर कारवाई केली आहे. पोलीस आणि सरकारची भूमिका जोपर्यंत गुन्हेगाराच्या विरुध्द आणि अन्यायग्रस्तांच्या बाजूने तयार होणार नाही, तोपर्यंत असे प्रकार समाजात घडतच राहतील आणि त्याची झळ सर्वच समाजाला कोणत्या ना कोणत्या पध्दतीने सोसतच रहावी लागणार आहे.
सोमवार २१ डिसेंबर रोजी निषेध महामोर्चाच्या माध्यमातून या गुन्हेगांराना अद्दल घडवण्यासाठी आणि झोपलेल्या शासन-प्रशासनाला जागं करण्यासाठी राज्यस्तरीय निषेध महामोर्चात सहभागी होऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडावे, असे कळकळीचे आवाहन निषेध महामोर्चाचे संयोजन समितीचे मारोती वाडेकर, सतीश कावडे, प्रा. सदाशिव भुयारे, प्रा. राजू सोनसळे, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. डॉ. उज्ज्वला पडलवार, रमेश मस्के, शाम कांबळे, दयानंद बसवंते, सूर्यकांत तादलापूरकर, प्रा. इरवंत सूर्यकार, ईश्वरअण्णा जाधव, माधव डोम्पले, सुग्रीव वाघमारे, सूर्यकांत शिंदे, रंजीत बाऱ्हाळीकर, परमेश्वर बंडेवार, यादव सूर्यवंशी, मालोजी वाघमारे, नागोराव आंबटवाड, प्रदीप वाघमारे, साहेबराव गुंडिले, शिवाजी नुरूंदे, भारत सरोदे, प्रवीण भालेराव, सुरेश वंजारे, उत्तम बाबळे, कॉ. नजीर शेख, अमर आईलवार, नितीन वाघमारे, महेंद्र भटलाडे, गणेश मोरे, बाळू लोंढे, आनंद वंजारे, संदीप मोरे आदींनी केले आहे