महाराष्ट्र बंद : नांदेडमध्ये आंदोलकांनी फोडली पोलिसांची गाडी, तीन पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 13:41 IST2018-01-03T13:36:41+5:302018-01-03T13:41:32+5:30
नांदेडमधील आंबेडकर नगर भागात जमावानं दगडफेक करत पोलिसांचंच वाहन फोडले. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.

महाराष्ट्र बंद : नांदेडमध्ये आंदोलकांनी फोडली पोलिसांची गाडी, तीन पोलीस जखमी
नांदेड - भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. नांदेडमधील आंबेडकर नगर भागात जमावानं दगडफेक करत पोलिसांचंच वाहन फोडले. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.