Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:22 PM2019-10-12T20:22:56+5:302019-10-12T20:31:14+5:30

देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा डाव

Maharashtra Election 2019: Governments trying to take time off in the name of Article 370 : Ashok Chavan | Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

Next
ठळक मुद्देवंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदाशिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे.

मुदखेड : खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजप-शिवसेना सरकारची नीती आहे. देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला़

युती सरकारने मागील ५ वर्षे राज्यातील सर्वसामान्यांची फसवणूक तसेच दिशाभूल केल्याचे सांगत हा सर्वसामान्य माणूसच या निवडणुकीत शिवसेना-भाजपला धडा शिकवेल़ युपीपीचे पाणी हिंगोली, परभणीकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. असे झाल्यास उमरी, धर्माबाद, भोकर, अर्धापूर, हदगाव या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
चव्हाण यांनी शुक्रवारी मुदखेड तालुक्यातील धनज, खांबाळा, दुधनवाडी, तिरकसवाडी आदी गावांचा प्रचारदौरा केला. त्यानंतर सरेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धवराव पवार, संतोष गव्हाणे, माधव पांडागळे, बाळासाहेब देशमुख, गजानन पवार, सदाशिव खवासे, श्यामराव पाटील, अ‍ॅड. वीरभद्र देवठाणकर, उद्धवराव पाटील, सरीता वारकड, पप्पूराव टेकाळे, शिवदास हिपरगे, राजेश कळणे, जीवनराव कळणे आदींची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, खोट्या आश्वासनांना भुलून देश गमावला. आता राज्य गमावू नका, असे सांगत चांद्रयान मोहीम, कलम ३७० यावर चर्चेचे गुºहाळ गाळले जात आहे. प्रत्यक्षात मागील पाच वर्षांत काय केले? याचा हिशेब या सरकारने मांडला पाहिजे. मात्र पाच वर्षांत सर्वसामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम या सरकारने  केले असल्याने सांगण्यासारखा मुद्दाच नसल्याने कलम ३७० वर वेळ मारुन नेली जात असल्याचे ते म्हणाले. पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या का थांबल्या नाहीत? बेरोजगारी वाढत आहे, त्यावर काय उपाययोजना केल्या? कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचली नाही? जाहीर केलेल्या मेगा भरतीचे काय झाले? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, असे आव्हान चव्हाण यांनी दिले. यावेळी संतोष गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे. अशी टीकाही त्यांनी केली़  

वंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदा
लोकसभा निवडणुकीत काहींनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली. त्याचा काय फायदा झाला. या आघाडीमुळे ‘तुला न मला घाल दुसऱ्याला’ अशी अवस्था झाल्याने भाजपाला बळ मिळाले. मराठा, दलित समाजाचे मतदान फोडायचे आणि सत्ता हस्तगत करायची, ही सेना-भाजपाची खेळी असून तोच खेळ आता पुन्हा विधानसभा निवडणुकीतही खेळला जात असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. गावांच्या भानगडीत मला पाडू नका, गावातील हेवेदावे, तंटे सोडवा पण वड्याचे तेल वांग्यावर काढू नका. त्यामुळे केवळ काँग्रेसचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.

Web Title: Maharashtra Election 2019: Governments trying to take time off in the name of Article 370 : Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.