Maharashtra Election 2019 : डिपॉझिट कधी परत मिळणार हो...? माघार घेतलेल्या इच्छुकांची अधिकाऱ्यांकडे विचारणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 07:14 PM2019-10-08T19:14:12+5:302019-10-08T19:19:21+5:30

माघार घेतलेल्या इच्छुकांच्या मागणीने अधिकारी बुचकळ्यात 

Maharashtra Election 2019: When will the deposit be returned ...? withdrawn aspirants questions to administration | Maharashtra Election 2019 : डिपॉझिट कधी परत मिळणार हो...? माघार घेतलेल्या इच्छुकांची अधिकाऱ्यांकडे विचारणा 

Maharashtra Election 2019 : डिपॉझिट कधी परत मिळणार हो...? माघार घेतलेल्या इच्छुकांची अधिकाऱ्यांकडे विचारणा 

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी दहा हजार रुपये अनामतराखीव मतदारसंघासाठी पाच हजार रुपयांची अनामत

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली होती़ एकट्या भोकर मतदारसंघात १३४ जणांनी अर्ज भरले होते़ अशीच परिस्थिती इतर मतदारसंघातही होती़ सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आलेले अनेक अपक्ष उमेदवार भरलेले डिपॉझिट कधी परत मिळणार? याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी करीत होते़ त्यामुळे निवडणूक विभागाचे अधिकारीही बुचकाळ्यात पडले होते़

विधानसभा निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी दहा हजार रुपये तर राखीव मतदारसंघासाठी पाच हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते़ जिल्ह्यातील नऊ मतदार संघात अनेक इच्छुकांनी अनामत रक्कम भरत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या अनेक उमेदवारांचा भ्रमनिरास झाला़ त्यानंतर सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात या उमेदवारांनी माघार घेण्यासाठी गर्दी केली होती़ नऊ मतदारसंघातून तब्बल १९२ जणांनी माघार घेतली़

माघार घेण्यापूर्वी अनेक उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम कधी परत मिळणार म्हणून अधिकाऱ्यांना भंडावून सोडले़ त्यामुळे अधिकारीही बुचकाळ्यात पडले़ यावेळी उमेदवारासोबत आलेल्या एका महाभागाने उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावरही स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी अधिकाऱ्याने त्याला अडविले़ 

Web Title: Maharashtra Election 2019: When will the deposit be returned ...? withdrawn aspirants questions to administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.