ऐकावं ते नवलच... गावचं उपसरपंचपद १० लाखांना विकले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 02:36 AM2020-11-24T02:36:49+5:302020-11-24T02:37:13+5:30
शनिवार रात्री आठ वाजता महाटी गावच्या मारुती मंदिराच्या बाहेरील ओट्यावर गावकरी मंडळी एकत्रित जमा झाली. या ओट्यावर एक बैठक घेऊन बैठकीमध्ये उपसरपंचपदासाठी ज्यांना उभं राहायचं आहे
बारड (जि.नांदेड) : महाटी ता.मुदखेड येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या असून ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. काही गावांमध्ये तर चक्क सरपंच, उपसरपंचपद विक्री केले जात आहे. मुदखेड तालुक्यातील महाटी येथे उपसरपंचपदासाठी गावकऱ्यांनी बोली लावली होती. यामध्ये उपसरपंचपद तब्बल दहा लाख पन्नास हजार रुपयांमध्ये विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.
शनिवार रात्री आठ वाजता महाटी गावच्या मारुती मंदिराच्या बाहेरील ओट्यावर गावकरी मंडळी एकत्रित जमा झाली. या ओट्यावर एक बैठक घेऊन बैठकीमध्ये उपसरपंचपदासाठी ज्यांना उभं राहायचं आहे, निवडणूक लढवायची आहे त्याने पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गावातील विद्यमान सरपंच प्रतिनिधी बळीराम पाटील ढगे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व्यंकटराव मरोतराव ढगे, माजी सरपंच माधवराव तानाजी ढगे यांनी या बोलीत सहभाग घेतला होता. उपसरपंचपदाच्या बोलीची सुरुवात ७ लाख १ हजार रुपये ठेवण्यात आली होती. त्यानुसार बळीराम ढगे, व्यंकटराव ढगे, मारोतराव ढगे यांनी बोली लावली होती.