सांगवी ग्रामपंचायतवर महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:19+5:302021-02-20T04:50:19+5:30
मुखेड : तालुक्यातील सांगवी बेनक येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीनाबाई नारायण जोंधळे, तर उपसरपंचपदी अमृता उमाकांत मस्कले यांची बिनविरोध ...
मुखेड : तालुक्यातील सांगवी बेनक येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीनाबाई नारायण जोंधळे, तर उपसरपंचपदी अमृता उमाकांत मस्कले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सांगवी बेनक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये चुरस दिसून आली. यात एकता ग्रामविकास पॅनलला ९ पैकी ६ जागा मिळाल्या.
प्राधिकृत अधिकारी म्हणून सी. एस. आहिरे व ग्रामविकास अधिकारी जी. व्ही. देशमुख उपस्थित हाेतेे. यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंचपदी मीनाबाई जोंधळे तर उपसरपंच कु. अमृता मस्कले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य बालाजी करडखेले, रेणुकादास पत्की, संतोष चाबरे, अर्चना मस्कले, यासह गावातील उमाकांत मस्कले, संभाजी करडखेले, विजयकुमार मस्कले, मिलिंद जोंधळे, धोंडिबा गायकवाड, व्यंकट गंगावणे, भीमराव गायकवाड, मलिक्कार्जुन कादापुरे, सतीश धनवाडे, मेघराज बळते, यासह गावकरी उपस्थित होते.