७९ सरपंच व ५१ उपसरपंच पदावर महिलराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:16 AM2021-02-14T04:16:59+5:302021-02-14T04:16:59+5:30

कंधारः तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीचे ११ व १२ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाची निवड करून गठन ...

Mahilraj in 79 Sarpanch and 51 Deputy Sarpanch posts | ७९ सरपंच व ५१ उपसरपंच पदावर महिलराज

७९ सरपंच व ५१ उपसरपंच पदावर महिलराज

Next

कंधारः तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीचे ११ व १२ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाची निवड करून गठन करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यात पाच गावाचे सरपंच व एका गावाचे उपसरपंच पद रिक्त आहे. मात्र ७९ गावातील सरपंच व ५१ गावात उपसरपंच पदावर नारी शक्ती विराजमान झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांच्या हाती गाव विकासाची दोरी असल्याचा विक्रम राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

तालुक्यात ९७ ग्रामपंचायतीत निवडणूक झाली. त्यात १५ ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्या. निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत झाली. त्यामुळे गावपुढाऱ्यांनी आपल्या हातून गावाची सत्ता जाऊ नये, यासाठी महिलांना निवडणुकीची संधी दिली. त्यामुळे महिला जास्त प्रमाणात निवडून आल्या. ग्रामपंचायतीचे गठन करण्याची प्रक्रिया करण्यात आली. दि. ११ व १२ रोजी सरपंच व उपसरपंच निवडी पार पडल्या. त्यात महिलांनी मोठी बाजी मारली असल्याचे समोर आले आहे. सरपंच ७९ व उपसरपंच ५१ महिला झाल्या आहेत. पुरुष सरपंच १३ तर ४५ उपसरपंच निवडले. फक्त १४ गावात सरपंच व १८ गावात उपसरपंच निवडणूक झाली. उर्वरित गावात बिनविरोध निवडी झाल्या.

पाच गावातील पाच सरपंच पदे रिक्त आहेत. त्यात दहिकळंबा (सर्वसाधारण महिला), पांगरा व दैठणा (अनुसूचित जाती महिला), रहाटी (ना.मा.प्रवर्ग) व शिरुर (अनुसूचित जमाती) येथे सरपंचपद रिक्त राहिले आहे. तसेच देवईचीवाडी गावाचे उपसरपंचपद रिक्त राहिले आहे.

महिलांच्या हाती गावाची सूत्रे असलेली गावे

शिर्सी बु. ,बोरी खु., कळका, पानभोसी, हाटक्याळ, महालिंगी, तेलूर, कंधारेवाडी, गऊळ, बहाद्दरपुरा, चौकीमहाकाया, लाडका, रुई, बाळांतवाडी, बाबुळगाव, हिप्परगा शहा, चिखलभोसी, भेंडेवाडी, जाकापूर, उमरगा खो., वंजारवाडी, गंगनबीड, तळ्याचीवाडी, आंबुलगा, बामणी प.क., फुलवळ, पेठवडज, उस्माननगर, देवईचीवाडी, सावळेश्वर, मजरे धर्मापुरी, धानोराकौठा, मंगलसांगवी, वहाद, राऊतखेडा, पानशेवडी,शिर्सी खु., नावंदयाचीवाडी, भुत्याचीवाडी, काटकळंबा, गोगदरी, बिजेवाडी, संगमवाडी, घोडज, तेलंगवाडी, गुंडा बिंडा दिंडा, मानसिंगवाडी, चिंचोली प.क., लाठ खु., शेकापूर, नारनाळी, औराळ, येलूर, भंडारकुमठ्याचीवाडी, बोळका, घागरदरा, नंदनवन, मंगनाळी, नवघरवाडी, नागलगाव, मरशिवनी, गुटेवाडी, भोजूचीवाडी, मादाळी, खंडगाव ह., बारुळ, दाताळा, कुरुळा, संगुचीवाडी, वरवंट, बाचोटी, कौठा, हाळदा, कल्हाळी, मोहिजा परांडा, दिग्रस बु., हरबळ प.क., गोणार, भूकमारी या गावाचा विकास करण्यासाठी महिलांना मोठी संधी आहे.

Web Title: Mahilraj in 79 Sarpanch and 51 Deputy Sarpanch posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.