माहूर तालुक्यात पी. एम. किसान योजनेचे ३६९ अपात्र लाभधारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:14+5:302020-12-17T04:43:14+5:30
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांच्या माहितीमध्ये त्रुटी असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांच्या ...
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांच्या माहितीमध्ये त्रुटी असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांच्या करिता प्रत्येक गावात ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याकरिता ११ ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत विशेष मोहीम राबवून माहिती घेण्यात आली असून, सर्व यंत्रणेच्या साहाय्याने डाटा दुरुस्ती करून नवीन लाभार्थींच्या नावांची नोंदणी करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
कोट
ज्या पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांतील त्रुटींची अद्याप दुरुस्ती केली नाही. त्यांनी आपापल्या गावांतील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, तसेच चुकून अपात्र असलेल्या लाभधारकांना लाभ मिळाला असेल तर त्यांनी धनादेशाद्वारे अथवा रोख स्वरूपात माझ्याकडे रक्कम भरणा करावी त्याची रीतसर पावती देण्यात येईल -सिद्धेश्वर वरणगावकर, तहसीलदार माहूर
आयकर भरणा करणारे २०० शेतकरी लाभधारक असून, त्यांच्याकडून १७ लाख ८४ हजार रुपये येणे बाकी असून, त्यातील १ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे. तसेच आयकर न भरणारे; परंतु अपात्र ठरलेले १६९ शेतकरी असून, त्यांचेकडून ४ लाख ९४ हजार रुपये प्राप्त होणे बाकी आहे. नोडल अधिकाऱ्यासह शेतकऱ्यांना काही अडचण भासल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण करता येईल. -विश्वास फड, तलाठी, वाई बाजार.