मोलकरणीने घरातील अंगठी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:06+5:302021-07-24T04:13:06+5:30
शेतकऱ्यावर कत्तीने हल्ला मुखेड तालुक्यातील जांब येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका शेतकऱ्यावर कत्ती आणि कुऱ्हाडीने हल्ला चढविण्यात आला. या ...
शेतकऱ्यावर कत्तीने हल्ला
मुखेड तालुक्यातील जांब येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका शेतकऱ्यावर कत्ती आणि कुऱ्हाडीने हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २१ जुलै रोजी घडली.
संतोष संभाजी कठाळे हे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पांडुरंग मोरे यांच्या घरासमोर उभे असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून कठाळे यांच्यासोबत वाद घालून मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणात मुखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला
जिल्ह्यात मुखेड, वजिराबाद आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. नागेश शिवमूर्ती गोंगे यांची मुखेड ते नरसी रस्त्यावरून, डॉक्टर लाइन भागात वैकुंठ कंदकुर्ते, तर वसरणी येथून व्यंकट गुंडाळे यांची दुचाकी लांबविण्यात आली.
चारचाकी वाहनासाठी छळ
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा येथे चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. दिसायला काळी आहेस म्हणून पीडितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मुदखेड, वजिराबादेत जुगारावर धाडी
मुदखेड शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी दीड हजार रुपये जप्त केले, तर वजिराबाद हद्दीत वाघी रस्त्यावर मटका खेळणाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून एक हजार रुपये जप्त केले.
साडेपाच हजारांची दारू पकडली
हदगाव तालुक्यातील चाेरंबा येथील सुप्रिया धाब्यावर पोलिसांनी धाड टाकली. २१ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी साडेपाच हजार रुपयांची देशी दारू जप्त केली. या प्रकरणात मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.