जिल्ह्यात आता रेशनवर मिळणार मका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:31 AM2021-02-18T04:31:27+5:302021-02-18T04:31:27+5:30
जिल्ह्यात यापूर्वी किनवट तालुक्यात भरडधान्य उपलब्ध करून देण्यात आले होते; परंतु या धान्याला मागणी नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले होते. ...
जिल्ह्यात यापूर्वी किनवट तालुक्यात भरडधान्य उपलब्ध करून देण्यात आले होते; परंतु या धान्याला मागणी नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले होते. आता संपूर्ण जिल्ह्यात मका स्वस्त धान्य दुकानावर दिला जाईल. मका हे भरडधान्य नियमित आहारात नसताना तो दिला जात आहे, त्याचवेळी नियमित धान्य असलेले गहू कमी होत असल्याने नाराजी निर्माण होणार आहे.
चौकट - एक महिनाच मका दिला जाणार
राज्यात किमान आधारभूत किमतीवर खरेदी केलेले भरडधान्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे भरडधान्य केवळ एक महिन्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यालाही नियतन प्राप्त झाले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. - लतीफ पठाण - जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड
मक्याचे करायचे काय
स्वस्त धान्य दुकानावर आता मका दिला जाणार आहे. या मक्याचा वापर कशासाठी करायचा, हाच प्रश्न आहे. दररोजच्या आहारातील गहू कमी केला जाणार आहे. ही बाबही चुकीची आहे. त्यामुळे मका न देता आम्हाला स्वस्त धान्य दुकानावर साखर, गहू, तेल या नेहमीच्या बाबी दिल्यास चांगले राहील- राजकुमार वाघमारे - लाभार्थी