पाच ब्रास वाळू उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:22 AM2021-02-25T04:22:00+5:302021-02-25T04:22:00+5:30
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची संघटना नांदेड - येथील एका बैठकीत एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणी अशी- अध्यक्ष ...
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची संघटना
नांदेड - येथील एका बैठकीत एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणी अशी- अध्यक्ष विवेक चौधरी, शिवराज पेंडकर, उपाध्यक्ष एस.के.हमीद, एल.डी.बामणे, एस.आर.कोकाटे, सचिव एस.एन.अंबेकर, सहसचिव डी.एम. गंगातीरे, महिला प्रतिनिधी शकुंतला कंधारे, सल्लागार समिती ॲड.जे.पी.सूर्यवंशी, वाय.डी. वळसे, टी.डी. लदवे, बी.एन.गरजे, कार्यकारिणी सदस्य के.व्ही.गंजेवार, एस.के. युसुफभाई, एम.बी. खेडकर.
प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड - सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजन इंडियन फोर्स ॲकडमीच्या वतीने उर्वसी घाट येथे करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे प्रशिक्षण कमी शुल्कात होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य बालाजी हासेवाड, ॲड.नितीन कागणे, अनिरूद्ध शिरसाठ, उमेश चौधरी, निता देशमुख, लक्ष्मीकांत हाटकर, व्यंकटेश सुलगेकर, मोनीष ठाकूर, अमन साखोरे, अजय पारदे यांनी केले.
विवाहितेचा छळ
हदगाव - हदगाव शहरातील मुल्लागल्ली येथील २६ वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या आरोपीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दुचाकी घेण्यासाठी माहेराहून २०हजार रुपये घेवून ये म्हणून आरोपी तिचा छळ करीत होते. याच मागणीसाठी तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यादव यांची बदली
नांदेेड - येथील जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अमोल यादव यांची बदली पुणे येथील पणन मंडळात झाली आहे. पदाचा अतिरिक्त पदभार अनिल चव्हाण यांच्याकडे देण्यात आला. सोमवारी यादव यांनी पदभार स्वीकारला. डॉ.यादव हे ऑगस्ट २०२० मध्ये नांदेडला रुजू झाले होते. जेमतेम सहा महिन्याच्या आतच त्यांची बदली करण्यात आली.
घडामोडे यांचा सत्कार
नरसीफाटा - ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब घडामोडे यांचा नरसी येथे सत्कार करण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव लोहगावे यांच्या घरी आयोजित कार्यक्रमाला संभाजी भिसे, आनंदराव लोहगावे, विश्वंभर लोहगावे, गोविंदराव पहेलवान, नामदेव सूर्यवंशी, खाकीबा सूर्यवंशी, देवीदास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
संविधान पुस्तकाचे वाटप
कुंडलवाडी - येथील मिलींद प्राथमिक शाळा व विद्यालयात संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी कैलास वाघमारे, नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेष ऱ्याकावार, सपोनि सुरेश मांटे, उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, सायरेड्डी ठक्कुरवाड आदी उपस्थित होते.
सीईओंच्या विविध शाळांना भेटी
लोहा - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी गुरुवारी तालुक्याच्या दौऱ्यात जि.प. शाळा पार्डी, पळशी, वडेपुरी, डेरला तसेच लोह्यातील संत गाडगे महाराज विद्यालयाला भेट देवूनपाहणी केली. यावेळी जि.प. सदस्या प्रणिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संतोष नादरे आदी उपस्थित होते.
गाडगे महाराज जयंती
हदगाव - तालुक्यातील बरडशेवाळा, पळसा, मनाठा, बामणीफाटा परिसरात संत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी करण्यात आली. पळसा येथे सरपंच शिल्पा कांबळे, उपसरपंच संजय काला, बाजार समितीचे सदस्य विलास मस्के, कोंडबा दवणे, ग्रा.पं. सदस्य शंकर निलेवार, दीपक पाटील, विकास कांबळे, गजानन गंगासागर, बालाजी भीसे आदी उपस्थित होते.
कोरोना तपासणी सुरू
माहूर - मराठवाड्यातील सीमेवर केरोळी फाटा येथे विदर्भातील प्रवाशांची चाचणी करूनच प्रवेश दिला जात आहे. चेकनाक्यावर तालुका आरोग्य अधिकारी साहेबराव भीसे, वैद्यकीय अधिकारी किरणकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे, नगर पंचायत अध्यक्ष वैजनाथ स्वामी, सुरेंद्र पांडे, गणेश जाधव आदी कर्तव्य बजावत आहेत.