पावडेवाडी गावाची स्वतंत्र नगरपंचायत करा : कल्याणकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:17+5:302021-06-24T04:14:17+5:30
नांदेड महानगरपालिकेने यापूर्वीच जंगमवाडी, वसरणी, रहिमपूर, वाघाळा, असदवन, फतेजंगपूर, कौठा या गावांचा समावेश केला होता. त्यानंतर २००९ मध्ये ...
नांदेड महानगरपालिकेने यापूर्वीच जंगमवाडी, वसरणी, रहिमपूर, वाघाळा, असदवन, फतेजंगपूर, कौठा या गावांचा समावेश केला होता. त्यानंतर २००९ मध्ये तरोडा खु. तरोडा बु., सांगवी या गावांचा समावेश करण्यात आला. नव्याने समावेश केलेल्या भागात ड्रेनेजलाईन, पाण्याची पाईपलाईन, तसेच रस्ते अशा मूलभूत सुविधांचा अभाव असून, सिडको-हडको भागात घरकुल योजनासुद्धा प्रशासनाला राबविता आलेली नाही, संबंधित गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून अद्यापपर्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता व भविष्यात हद्दवाडीत येणाऱ्या भागाचा विकास करणे शक्य नाही. डिसेंबर २०२० च्या सर्वसाधारण सभेच्या पुरवणी विषयपत्रिकेतील विषय क्रमांक तीनमधील हद्दवाढीच्या प्रस्तावात शहरालगतची कोणती गावे घेणार याचासुद्धा उल्लेख केला नाही. यापूर्वीच महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात घेतलेल्या गावांचा मूलभूत विकास झालेला नाही. आता नव्याने पावडेवाडी गावाचा समावेश कशासाठी महानगरपालिका आपल्या क्षेत्रात करीत आहे, असा सवालदेखील आ. बालाजी कल्याणकर यांनी केला आहे.
पावडेवाडी गावाची स्वतंत्र नगरपंचायत तयार करण्यासाठी व या गावाचा समावेश महानगरपालिकेत करू नये, अशी मागणी कल्याणकर यांनी केली.