लोकसहभागातून गावे स्वच्छ व सुंदर करा : सुधीर ठोंबरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:10+5:302021-02-09T04:20:10+5:30
माझा गाव सुंदर गाव उपक्रमाअंतर्गत ७ फेब्रुवारी रोजी नांदेड तालुक्यातील कोटीतीर्थ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ...
माझा गाव सुंदर गाव उपक्रमाअंतर्गत ७ फेब्रुवारी रोजी नांदेड तालुक्यातील कोटीतीर्थ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
नांदेड पंचायत समितीच्या सभापती कावेरीताई बालाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी ए. एल. सरोदे, बबन वाघमारे, गटशिक्षण अधिकारी रुस्तम आडे, बालविकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी मिरकुटे, कृषी अधिकारी राहुल राऊत, व्ही. आर. चिंचोलकर, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, उपअभियंता शास्त्री, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. चव्हाण, प्रशासक विस्तार अधिकारी सतीश लाकडे
आदींची मंचावर उपस्थिती होती.
ठोंबरे म्हणाले, सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावासाठी श्रमदान करावे. आपले घर, परिसर व गाव नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. दर गुरुवारी एक दिवस गावासाठी द्या, श्रमदानातून गावे बदलतील. हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करावे, असेही ते म्हणाले.
प्रारंभी महात्मा गांधी व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला.
गटविकास अधिकारी ए. एन. सरोदे यांनी माझा गाव सुंदर गाव या उपक्रमांतर्गत गावात करण्यात येणाऱ्या कामांची ग्रामस्थांना माहिती दिली. बबन वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, उपअभियंता शास्त्री आदींनी विचार मांडले. तालुक्यातील सर्व गावांमधून माझा गाव सुंदर गाव ही संकल्पना लोकचळवळ म्हणून राबवून तालुक्यातील सर्व गावे सुंदर करण्याचा संकल्प विस्ताराधिकारी व ग्रामसेवकांनी केला असल्याचे विस्तार अधिकारी जीवन कांबळे यांनी सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षलागवड, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, ग्राम स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाला डी. के. आडेराघो, डी. एस. शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रामा वाघमारे, गोदावरी सूर्यवंशी, दिनेश वाघमारे, छाया वाघमारे, दीपिका वाघमारे, सुमित्रा मेने, सुनीता वाघमारे, माजी सरपंच बबन वाघमारे, ग्रामसेविका कमल तिडके, केशव वाघमारे, आनंदा मेने, नारायण सूर्यवंशी, सटवाजी सूर्यवंशी, गंगाधर वाघमारे, मुंजाजी वाघमारे, माधव वाघमारे, कुसुमताई वाघमारे यांची उपस्थिती होती.