माहूरमध्ये मांडूळतस्कर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:42 PM2019-04-30T23:42:28+5:302019-04-30T23:43:48+5:30

माहूर वनपरिक्षेत्रात लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या सहा पुरुष व एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मांडूळ जप्त करण्यात आले.

mandul snake Smuggler arrested in mahur | माहूरमध्ये मांडूळतस्कर गजाआड

माहूरमध्ये मांडूळतस्कर गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देएका महिलेसह सहा पुरुष घेतले ताब्यात, मांडुळाची लाखोंची किंमत

श्रीक्षेत्र माहूर : माहूर वनपरिक्षेत्रात लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीच्या सापाचीतस्करी करणाऱ्या सहा पुरुष व एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मांडूळ जप्त करण्यात आले.
३० एप्रिल रोजी माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांना मिळालेल्या माहितीवरुन सापळा रचण्यात आला. पथकाने २ मांडूळ प्रजातीचे साप हस्तगत केले. यावेळी एक महिला व ६ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मांडूळाचे वजन ५५० ग्रॅम व १.८० किलोग्रॅम आहे. आंतरराष्टÑीय बाजारात या मांडूळाची किंमत लाखो रुपये आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून तीन मोटारसायकली, सात मोबाईल हस्तगत करण्यात आले. आशा विजय चव्हाण (रा.निंगनूर ता.उमरखेड) सुरेश शंकर राठोड (रा.मदनापूर), मोतीसिंग प्रकाश तगरे (रा.परोटी), सुंदरसिंग गणपत पेळे (रा.परोटी), नागनाथ जालम पडवळ (रा.नागसवाडी), पांडुरंग शिवाजी जगताप (रा.नागसवाडी) लक्ष्मण माधव भरकड (रा.कमठाला ता.किनवट) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील कलम ९,३९,४८ अ व ५१ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
वनपथकात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील,मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक, फिरते पथक किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके यांचा समावेश आहे. यात वनपाल सोनकांबळे, वनपाल संतवाले, वनरक्षक फोले, श्रीमती माहुरे घोरबांड, कोटकर, कराळे, गेडाम, राठोड, मुसांडे वानोळे, शिंदे बरले धोंडगे, क्षीरसागर भूतनार आठवले यांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली.
दरम्यान, तस्करामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील जंगलाशेजारील गावच्या आरोपींचा समावेश असल्याने या प्रकरणाचा संबंध शेजारच्या तेलंगणा राज्याशी असल्याची शंका व्यक्त होत आहे. गुप्तधन शोधण्यासाठी मांडूळ हे उपयोगी जीव असल्याची लोकवंदता आहे.

Web Title: mandul snake Smuggler arrested in mahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.