भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी नांदेडमध्ये अनेकजण उत्सुक; रावसाहेब दानवे यांची गुगली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 04:27 PM2018-11-26T16:27:12+5:302018-11-26T16:29:08+5:30

नांदेडमध्ये भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याची गुगली भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टाकली.

Many are keen on Nanded to take over BJP's lotus; Raosaheb Danve's googly on Nanded Lokasabha seat | भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी नांदेडमध्ये अनेकजण उत्सुक; रावसाहेब दानवे यांची गुगली 

भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी नांदेडमध्ये अनेकजण उत्सुक; रावसाहेब दानवे यांची गुगली 

Next
ठळक मुद्देहिंगोली, नांदेडमध्ये विशेष रणनिती आखणारनांदेडच्या उमेदवारीवरून गुगली 

नांदेड : मागील लोकसभा निवडणुकीत नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपा अपयशी ठरला. मात्र येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ जिंकण्यासाठी पक्षाच्यावतीने विशेष रणनिती आखणार आहे. विशेषत: नांदेडमध्ये भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याची गुगली भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टाकली.

पक्ष बांधणी तसेच निवडणूकपूर्व आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २८८ विधानसभा मतदारसंघात जाऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, ठाणे, कल्याणनंतर आता मराठवाड्याचा दौरा करीत असून दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्ह्यात जावून कार्यकर्त्यांकडून निवडणूक तयारीची माहिती घेत आहे. नांदेड जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत पक्षाचे काम वाढले आहे. अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यातही असल्याचे सांगत थेट मतदारांपर्यंत जाण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडावे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले. 

बैठकीला संघटनमंत्री विजय पुराणिक, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, संतुक हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. गंगाराम ठक्करवाड, बालाजी शिंदे, चैतन्य देशमुख, प्रविण साले, व्यंकटेश साठे, श्रावण पाटील भिलवंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

नांदेडच्या उमेदवारीवरून गुगली 
नांदेड लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथे कॉंग्रेस प्रदेशाक्षध्य अशोक चव्हाण सध्या खासदार आहेत. यामुळे या जागेला विशेष महत्व आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड भाजपमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. मात्र आज दानवे यांनी नांदेडमध्ये भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत अशी गुगली टाकून इतर विरोधकांसह स्वपक्षातील इच्छुकांनाही एकप्रकारे इशाराच दिला आहे.  

सेना - भाजप एकत्रच

आगामी निवडणुका शिवसेनेसह समविचारी पक्षांना सोबत घेवून लढण्याचा मानस आहे. शिवसेनेने आता मंदिर उभारण्याची हाक दिली आहे. राम मंदिराच्या मुद्यावर शिवेसना कालही आमच्यासोबत होती आणि आजही आमच्याबरोबरच असल्याचे सांगत प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सेना-भाजपात काही ठिकाणी संघर्ष होत असला तरी आम्ही एकत्रच असल्याचे सांगत मागील निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले होते. येणाऱ्या निवडणुकीतही पाच-सहा जागा वगळता राज्यभरात जनता भाजपच्याच पाठीशी उभी असल्याचे पुन्हा दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याबाबत प्राधान्याने विचार करणार असल्याचेही ते म्हणाले. 

Web Title: Many are keen on Nanded to take over BJP's lotus; Raosaheb Danve's googly on Nanded Lokasabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.