अनेक ग्रामपंचायतींना दिव्यांगाचा निधी वाटप करण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:50 AM2020-12-04T04:50:29+5:302020-12-04T04:50:29+5:30
दिव्यांग व्यक्तींसाठी २०१२ पासून महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामसेवक दिव्यांगाना जाणूनबूजून ...
दिव्यांग व्यक्तींसाठी २०१२ पासून महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामसेवक दिव्यांगाना जाणूनबूजून निधी वाटप करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे यातील अनेक ग्रामपंचायतीने २०१२ पासून आजपर्यंत एकवेळ ही निधी वाटप केला नाही असे सांगण्यात आले या आर्थिक वर्षात तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त निधी वाटप करणे गरजेचे होते. आणि ग्रामपंचायतीमध्ये अपंगांची नोंदणी करण्याचा कायदा असूनही त्याची तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत अंमलबजावणी केली जात नसल्याचे सांगितले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन परिस्थितीत अपंगाचे सध्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण सुरू आहे. असे असताना ग्रामपंचायतींनी राखीव निधीतून वाटप करण्याची मागणी दिव्यांग नागरिक ग्रामपंचायतकडे करीत आहेत हिमायतनगर तालुक्यात ५२ ग्रामपंचायत अस्तित्वात असून यातील कामारी, सरसम, पोटा,सिरंजनी,पवना,सवना,सोनारी,वारंगटाकळी,पारवा,आदी मोठ्या ग्रामपंचायत असून ५२ पैकी अर्ध्याहून अधिक ग्रामपंचायतीने अपंगांना निधीचे वाटप केले नसल्याचे सांगितले जाते या संदर्भात कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सुधीस मांजरमकर हे निधी वाटप केली नाही अशा ग्रामपंचायतीवर व अधिकारी यांच्यावर काय कार्यवाही करतील आणि अपंगांना न्याय देतील अशी आशा लाभार्थी बाळगून आहेत.