सुखद ! घरीच उपचार घेवून अनेकजण करताहेत कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 06:24 PM2020-11-05T18:24:25+5:302020-11-05T18:25:32+5:30
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार १९९
नांदेड- बुधवारी सायंकाळी कोरोना तपासणीचे ९२६ अहवाल प्राप्त झाले. यातील ८७१ अहवाल निगेटिव्ह आले तर ५१ नवे बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या १९ हजार ३३७ एवढी झाली आहे. दरम्यान मागील २४ तासात कोरोनाने शहरातील यशवंतनगर येथील एका ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतल्याने बाधित मृत रुग्णांची संख्या ५१९ वर गेली आहे. विशेष म्हणजे उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के एवढे झाले आहे.
बुधवारी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ३१ बाधित आढळून आले.तर ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १२, हदगाव १, लातूर येथील ३ तर नांदेडग्रामीण आणि अर्धापूर येथील प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले. बुधवारी जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या नांदेड शहरातील यशवंतनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. सध्या जिल्ह्यातील विविध कोविडकेअर सेंटरमध्ये ४५३ जणांवर उपचार सुरु आहेत.यामध्ये विष्णुपूरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ७५, जिल्हा रुग्णालय ३३, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ४१, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण १४०, मुखेड ४, किनवट २४, देगलूर १०, हदगाव ७, लोहा ७, बिलोली २१, भोकर १२, अर्धापूर १५, बारड १, धर्माबाद १, हिमायतनगर ३, कंधार ४, मांडवी १, मुदखेड २ तर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात ५२ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील ३४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार १९९
जिल्हयातील बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.विशेष म्हणजे बाधित रुग्ण घरीच बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के इतके आहे. बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील १९, एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील १६, हदगाव येथील १, मुखेड येथील ३, जिल्हा रुग्णालयातील ५, नायगाव तालुक्यतील गृहविलगीकरणातील ७, बिलोली कोविड सेंटरमधील २ आणि खाजगी रुग्णालयातील ६ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.