ओळखपत्र असूनही मतदानापासून वंचित राहण्याची अनेकांवर वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:37 AM2019-04-19T00:37:40+5:302019-04-19T00:39:00+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यास गेलेल्या बऱ्याच मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून उपेक्षित रहावे लागल्याने अनेकांची निराशा झाली.
भोकर : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यास गेलेल्या बऱ्याच मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून उपेक्षित रहावे लागल्याने अनेकांची निराशा झाली.
लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाकरीता शहरातील ३२ वर्षीय सुशिल शंकरराव बिच्चेवार यांच्याकडे निवडणूक आयोगाने दिलेले वायएचके २६७१३५२ क्रमांकाचे ओळखपत्र असून त्यांनी मागील लोकसभा व विधानसभेत शहरातील जि.प. प्रा. शाळा नवीआबादी केंद्र क्र. ८७ येथे मतदानाचा हक्क बजावला होता. यामुळे आता लोकसभेसाठी मतदान करण्याकरीता गेले असता मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. विशेष म्हणजे यांच्याच परिवारातील इतर सदस्यांची नावे शहरातील प्रफुल्लनगरच्या मतदान केंद्रावर आहेत. तेथेही त्यांचे नाव यादीत नव्हते. अशाच प्रकारे बºयाच ठिकाणी अशा तक्रारी झाल्याचे समजते. आता यासाठी जबाबदार कोण हा संशोधनाचा विषय असला तरी सध्यातरी काही मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत.
नरसीफाटा : मतदार यादीतील चुकामुळे नरसीत मतदान करण्यासाठी बुथवर गेलेल्या अनेक मतदारांना मतदान करण्या पासून वंचीत रहावे लागले. ओळख पत्र सोबत ठेवून ही यादीत नाव बरोबर तर फोटो दुसºयाचा अल्याचा घोळ पहावयास मिळाला. मतदाना पासून वंचित रहाण्याची वेळ आलेल्या मतदारांनी तीव्र भावणा व्यक्त केल्या़
मोठ्या उमेदीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेलो, तेथे गेल्यावर माझे नाव यादीत नसल्याचे समजले. माझे नाव यादीतून कसे वगळले याबाबत मला काही माहित नाही परंतु मला आज माझ्या हक्कापासून वंचित राहावे लागले - सुशिल बिच्चेवार, भोकर.