स्वारातीम विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:21 AM2021-01-16T04:21:13+5:302021-01-16T04:21:13+5:30

यावेळी प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, महाराष्ट्र ...

Marathi language conservation fortnight at Swaratim University | स्वारातीम विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

स्वारातीम विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

Next

यावेळी प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. केशव सखाराम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मराठी भाषा, बोली, साहित्य यांच्या संदर्भाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास आणि साहित्येतिहास डॉ. शिवराज बोकडे, मराठी साहित्याची उर्दू भाषांतरे डॉ. असलम मिर्झा, मराठी साहित्य आणि बोली डॉ. जयद्रथ जाधव, बदलती वाचनसंस्कृती डॉ. स्वाती दामोदरे, सीमा प्रदेशातील मराठी बोली डॉ. विठ्ठल जंबाले, संगणक आणि मोबाइलवर मराठी भाषेचा वापर डॉ. सचिन नरंगले व डॉ. नीलेश देशमुख, आदी विषयांवर या कालावधीत व्याख्याने होणार आहेत.

२७ जानेवारी रोजी डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात स्वाती शिंदे पवार, व्यंकटेश चौधरी, हणमंत चांदगुडे, नारायण पुरी, गणेश घुले, विद्या सुर्वे बोरसे, दयासागर बन्ने, डी.के. शेख, स्वप्नदीप्ती कडू, कविता आत्राम, वैजनाथ अनमुलवाड हे सहभागी होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन होणार आहेत.

२८ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाषा संकुलाचे संचालक डॉ. शैलजा वाडीकर, मराठी विभागप्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख, समन्वयक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.

Web Title: Marathi language conservation fortnight at Swaratim University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.