विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:02+5:302020-12-25T04:15:02+5:30

मांडवी- सारखणी रस्त्याची दुरवस्था मांडवी : मांडवी ते सारखणी या २५ कि.मी. अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे ...

Marital harassment | विवाहितेचा छळ

विवाहितेचा छळ

Next

मांडवी- सारखणी रस्त्याची दुरवस्था

मांडवी : मांडवी ते सारखणी या २५ कि.मी. अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले. आदिलाबादकडे जाणारी वाहने याच रस्त्याने ये- जा करतात. त्यात छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांना अपघातही घडले आहेत. सध्या परिसरामध्ये कापसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खड्डे व कापसाच्या भाराने अपघाताची शक्यताही बळावली. संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

दिव्यांगांना निधी वाटप

माहूर : येथील नगर पंचायतीच्या वतीने दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप करण्यात आला. याकामी प्रहार दिव्यांग संघटनेने पाठपुरावा केला होता. संघटनेच्या वतीने उपोषणाचे निवेदनही देण्यात आले होते. उपोषणाची दखल घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष किशोर हुंडेकर, शहराध्यक्ष डॉ. बळवंत नागरगोजे, नगराध्यक्षा शीतल जाधव, उपनगराध्यक्षा अश्विनी पाटील, नगरसेवक, दीपक कांबळे, नगर पंचायत अधिकारी जोंधळे उपस्थित होते.

फुलाजी बाबा यांचा समाधी सोहळा

किनवट : सद्गुरू श्रीसंत फुलाजी बाबा यांच्या दुसऱ्या वर्षीचा महासमाधी सोहळा २४ व २५ रोजी उटनूर येथे होत आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र ढोले व समितीच्या वतीने करण्यात आले. यानिमित्ताने ध्वजारोहण, भजन, कीर्तन, आरती, ज्ञानधारणा, दिंडी, पालखी मिरवणूक, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.

Web Title: Marital harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.