विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:20+5:302021-02-05T06:08:20+5:30
हुतात्मा स्मारकात अभिवादन हदगाव - वायपना बु. येथील हुतात्मा स्मारकामध्ये शनिवारी शहीद दिनाच्या औचित्याने शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ...
हुतात्मा स्मारकात अभिवादन
हदगाव - वायपना बु. येथील हुतात्मा स्मारकामध्ये शनिवारी शहीद दिनाच्या औचित्याने शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच जयवंतराव पाटील, तलाठी फुलारी, ग्रामसेवक मोरे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर दुगाडे, विलासराव मानकरी, नागेश मेकेवार, बालाजी सावतकर आदी उपस्थित होते. पिंटू हुंडेकर यांनी आभार मानले.
लाँड्री दरात वाढ
देगलूर - दुकान भाडेवाढ तसेच कोळसा, वीज युनिटमध्ये दरवाढ झाल्याने इस्त्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय लाँड्री व्यावसायिकांनी एका बैठकीत घेतला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता अंजनीकर, उपाध्यक्ष उत्तम दाऊबे, अश्वीन कासराळे, सचिव तानाजी वाघमारे, कोषाध्यक्ष अर्जुन इबितवार आदी उपस्थित होते.
पल्स पोलिओला प्रतिसाद
हदगाव - तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित लसीकरण मोहिमेत २६ बूथवर ३,३३१ बालकांना पोलिओचे डोज देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोदरवाड, डॉ. जी. आर. सोळंके, कर्मचारी सतीश छत्रे, मकरंद लष्करे, सुनीता गाडेवाड, रमा जाधव, अरुणा काशेटवार, शिवप्रसाद देशमुख उपस्थित होते.
लसीकरणाचा शुभारंभ
वाईबाजार - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी पं.स. उपसभापती उमेश जाधव, उपसरपंच हाजी मस्तान खान, तालुका आरोग्य अधिकारी एस.बी. भिसे, नवीद खान, कैलास बेहरे, डॉ. श्रीनिवास हुलसुरे, डॉ. स्वप्निल राठोड, डॉ. स्वप्ना इंगोले उपस्थित होते.
मटक्यावर छापा
बारड - येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटक्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा मारला. यावेळी दोन आरोपींना पकडून कारवाई करण्यात आली. आरोपींकडून रोख २,८५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिओ लसीकरण उत्साहात
किनवट - शहरातील शासकीय नागरी दवाखाना सिद्धार्थनगर, जेतवन बुद्धविहार, बसस्टॅन्ड आदी ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरणाला सुरुवात झाली. नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, किरण नेम्मानीवार, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, डॉ. जडते, सुनील बगाटे, रत्नमाला भरणे आदी उपस्थित होते. सिद्धार्थनगर येथील कार्यक्रमासाठी आरोग्य सहायक प्रमिला हटकर, सीमा राठोड, अर्चना ढाकणे यांनी पुढाकार घेतला.
पाळेकर सेवानिवृत्त
उमरी - मौजे गोळेगाव येथील सहायक पशुवैद्यकीय अधिकारी एम. एस. पाळेकर सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी गोविंदराव पाटील, सोनबारत्न पारखे, विठ्ठलराव वाघमारे, कांबळे, दुधे, पी. व्ही. मिरेवाड उपस्थित होते.
हिमायतनगरात पाण्याची सोय
हिमायतनगर - शहरातील वाॅर्ड क्र. १२ मध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती. याकामी शिवसेनेचे विठ्ठल ठाकरे यांनी स्वखर्चाने बोअर मारून पाण्याची समस्या सोडविली. यावेळी विलास वानखेडे, अनिल भोरे, सुनील चव्हाण, मारोती शिंदे, बाबुराव माने, गोविंद शिंदे, गजानन वानखेडे, रवी वानखेडे आदी उपस्थित होते.
ऑनलाईन काव्यजागर
उमरी - कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने काव्यजागर कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. एस. एस. जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा जि. जळगाव येथील अरुण मोरे, डोंबिवली मुंबई येथील विजय जोशी होते. सूत्रसंचालन डॉ. गजानन देवकर यांनी केले.
तालुकाध्यक्षपदी शेख
किनवट - महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी परवीन शेख यांची निवड झाली. महिला जिल्हाध्यक्ष पद्मा गिरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
धर्माबाद - येथील जीवन संघर्ष या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा भूसंपादन अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते फुलेनगर नालंदा बुद्धविहार येथे पार पडला. यावेळी तहसीलदार दत्तात्रय शिंदे, सपोनि अशोक उजगरे, फौजदार अनिल सनगले, डॉ. वेणुगोपाल पंडित, महावितरणचे सुमित पांडे, उद्योजक सुबोध काकाणी आदी उपस्थित होते.