नणंदेच्या शिक्षणासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:16 AM2021-02-15T04:16:58+5:302021-02-15T04:16:58+5:30

हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर धाड नांदेड - शहरातील महाराणा प्रताप चौक भागात एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा ...

Marital harassment for Nanda's education | नणंदेच्या शिक्षणासाठी विवाहितेचा छळ

नणंदेच्या शिक्षणासाठी विवाहितेचा छळ

Next

हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर धाड

नांदेड - शहरातील महाराणा प्रताप चौक भागात एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. शनिवारी (दि. १३) रात्री दहा वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी दोन हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात पोलीस हेडकॉन्स्टेबल दारासिंग राठोड यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

पोलिसांनी अडीच हजार रुपयांची दारू पकडली

नांदेड : सोनखेड ते कलंबर जाणाऱ्या रस्त्यावर दारूची अवैधपणे होणारी वाहतूक पोलिसांनी पकडली. यावेळी आरोपीकडून अडीच हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलीस हेडकॉन्स्टेबल भानुदास बोकारे यांच्या तक्रारीवरून सोनखेडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मांडवी ठाण्याच्या हद्दीत एमएच २६, एबी४५७७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून नेण्यात येणारी दोन हजार रुपयांची दारू पकडण्यात आली. या प्रकरणात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

नवी आबादी भागात वाचनकट्टा

नवी आबादी : या भागातील मस्जिद परिसरात मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रांचा वाचन कट्टा सुरू करण्यात आला आहे. महापौर मोहिनी येवणकर यांच्या हस्ते या वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागनाथ गड्डम, साजीद अहमद जहागीरदार, मैसन चाऊस, अशफाक गुत्तेदार, अबरार, हाजी सिकंदर, सईद, रहिमोद्दीन यांची उपस्थिती होती.

Web Title: Marital harassment for Nanda's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.