ट्रॅक्टरसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:30+5:302021-02-26T04:24:30+5:30

शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर हिमायतनगर : येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद ...

Marital harassment for tractor | ट्रॅक्टरसाठी विवाहितेचा छळ

ट्रॅक्टरसाठी विवाहितेचा छळ

Next

शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

हिमायतनगर : येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी राम सूर्यवंशी, गोविंद शिंदे, आशिष सकवान, सचिन माने, संतोष साबळकर, गजानन हरडफकर, श्रीकांत सूर्यवंशी, किरण माने, पोशट्टी जाधव, शाम हांद्रे, विशाल जाधव आदी उपस्थित होते.

गाडगेबाबा यांना अभिवादन

नरसी : येथील जीवन विकास प्राथमिक शाळेत राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ए.जे. राणवळकर, नंदकिशोर नरसीकर, मारोती जाकारे, जिलानी बागवान, यशवंत गायकवाड, चिंतले, माने, कवटीकवार आदी उपस्थित होते.

हरभऱ्याला लागली आग

हदगाव : तालुक्यातील बरडशेवाळा गट क्र. १७ मध्ये दोन एकर जमीन आहे. या जमिनीत दोन एकर हरभरा पेरणी करण्यात आली होती. हरभरा कापून ढीग करण्यात आला होता. २२ रोजी रात्री हरभऱ्याला आग लागून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले. या प्रकरणी शरद जमदाडे यांनी मनाठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

गाडगे महाराजांना अभिवादन

कंधार : येथील कलापुष्प प्रतिष्ठानच्या वतीने समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. याानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी निरंजन वाघमारे, साईनाथ माळगे, व्यंकट कांबळे, महेश मोरे, कलापुष्पचे सचिव सत्यपाल गायकवाड, अभिजित गायकवाड, विनोद कांबळे आदी उपस्थित होते.

पाथरड येथे श्रद्धांजली

हदगाव : तामसा येथील संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ग्रा.पं. सदस्य विजय कसेवाड अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून अजित पाटील, प्रा. चंद्रकांत दगडपल्ले, कैलास कसेवाड, गजानन सूर्यवंशी, विकास सायाळकर, गजानन तगडपल्ले आदी उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचारी कोंडीत

लोहा : तालुक्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंंडी होत आहे. या कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी होत आहे. इतर जिल्ह्यात वेतनवाढ झाली मात्र नांदेड जिल्ह्यात वेतनवाढ झाली नाही. वेतनवाढीचा फरकसुद्धा देण्यात आला नाही.

वाळूचा लिलाव

लोहा : भारसावडा, पेनूर येथे ७२ ब्रास वाळूचा लिलाव झाला. यापोटी ३ लाख ३१ हजार २०० रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला. ४ हजार ६०० रुपये ब्रास असे वाळूचे भाव होते. दरम्यान, प्रशासनाने मोहीम राबवून सदर वाळू जप्त केली होती. याकामी उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, नायब तहसीलदार अशोक मेकाले, मंडळ अधिकारी डी.एल. कटारे, तलाठी मारोती कदम आदींनी सहभागी नोंदवला.

मुख्य चौकात अवैध वाहतूक

किनवट : तालुक्यातील सारखणी येथील मुख्य चौकात अवैध वाहतुकीची वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. येथील चौकात माहूर, किनवट, मांडवी, आदिलाबाद, पांढरकवडा आदी ठिकाणी जाणारी व येणारी वाहने थांबत असतात. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाई

मुदखेड : तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर काही गावांत वीज पुरवठा नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे.

महिलेची आत्महत्या

मुखेड : तालुक्यातील चांडोळा शिवारात एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी उघडकीस आली. सारिका चंदू मोरे (वय २६) असे मयत महिलेचे नाव असून ती मुखेड शहरातील गायकवाड गल्ली येथे राहत होती. रागाच्या भरात तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Marital harassment for tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.