संक्रांतीनिमित्त बाजारपेठ गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:33+5:302021-01-14T04:15:33+5:30
कोरोनाच्या सावटाखाली सण-उत्सव साजरे होत असून, नागरिकांनी आता कोरोनाची भीती दूर घालवली आहे. दरम्यान महागाईने कळस गाठला ...
कोरोनाच्या सावटाखाली सण-उत्सव साजरे होत असून, नागरिकांनी आता कोरोनाची भीती दूर घालवली आहे. दरम्यान महागाईने कळस गाठला आहे. शहरातील सर्वच बाजारपेठेत मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला महिलांची एकच गर्दी झाली होती. विशेषत: वजिराबाद, जुना मोंढा, श्रीनगर या भागातील दुकानांवर महिलांनी गर्दी केली होती. संक्रांतीनिमित्त गोड तीळ, बांगड्या, कुंकू , हळद आदी वस्तूंची विक्री हातगाड्यांवर सुरू होती. तर वर्कशाॅप, तरोडा नाका या भागात सुगडे घेण्यासाठी महिला दिसून आल्या. सणासाठी लागणाऱ्या फळभाज्यांची विक्री करण्यात येत होती. ऊस, वाळूक, बोरे, पेरू, आदी फळे विक्रीसाठी उपलब्ध होते.
संक्रांतीवर महागाईचे सावट आहे. नेहमीपेक्षा सणासाठी लागणाऱ्या वस्तंची विक्री १० ते २० टक्क्यांनी वाढली होती. कपड्यांच्या दुकानातही साड्या घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.