बाजारपेठ गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:15 AM2021-01-15T04:15:55+5:302021-01-15T04:15:55+5:30
सफाई कामगारांचा मोर्चा धर्माबाद - नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी २५ जानेवारी रोजी झाडू मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ...
सफाई कामगारांचा मोर्चा
धर्माबाद - नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी २५ जानेवारी रोजी झाडू मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रमिक संघ नांदेडचे चिटणीस कॉ.मुकुंद कदम यांनी दिली. धर्माबाद पालिकेत घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सफाई विभागात २०१३ पासून जवळपास ६४ सफाई कामगार काम करतात. सध्या अनेक अडचणी आहेत. यामध्ये किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावा, ईपीएफची रक्कम जमा करण्यात यावी, जमा केल्यास त्याच्या पावत्या द्याव्यात, नोव्हेंबर व डिसेंबरचा मासिक पगार देण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा असल्याचे कदम म्हणाले.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण
देगलूर - महावितरणच्या देगलूर विभागातील अनागोंदी कारभारामुळे लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांनी १२ जानेवारीपासून उपोषण सुरू केले. संघटनेचे सचिव बालाजी स्वामी यांना जाणीवपूर्वक करडखेड येथून कार्यमुक्त करण्यात आल्याचा आरोप आहे. यासंदर्भात वेळोवेळी विनंती करूनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्वामी यांचा आहे.
जयंती उत्साहात साजरी
लोहा - उस्माननगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती व्यापारी प्रकाश देशमुख यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला विठ्ठल ताटे, प्रदीप देशमुख, माणिक भिसे, लक्ष्मण तांदळे, व्यंकटेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सूर्यकांत पाटील यांनी केले. तर गणेश लोखंडे यांनी आभार मानले.
सर्कलवाड रुजू
उमरी - येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून गिरीश सर्कलवाड रुजू झाले आहेत. यापूर्वी ते बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पेशकार म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीवर त्यांची उमरीला बदली झाली. ते मूळचे बहाद्दरपुरा (कंधार) येथील आहेत.
जिजाऊ चौकाचे लोकार्पण
देगलूर - देगलूरच्या प्रवेशद्वाराजवळील जिजाऊ चौक उभारण्यात आला. या चौकाचे लोकार्पण नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रा.राजेश्वर पाटील, माजी सभापती शिवाजी देशमुख, शीतल अंतापूरकर, रोहीत साबणे, अंकुश देसाई, जि.प.सदस्य बबन पाटील, अशोक गंदपवार, श्याम पाटील, शैलेश उल्लेवार, नीतेश पाटील, धोंडिबा वानखेडे, सुशीलकुमार देगलूरकर, अविनाश नीलमवार, प्रशांत पाटील, शैलेश देशमुख, शशांक पाटील, कैलास येसगे, दत्तोपंत गुरुजी, रमेश जाधव, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.
संपर्क कार्यालयाचा शुभारंभ
हिमायतनगर - अयोध्या येथील राम मंदिर बांधकाम निधी संपर्क कार्यालयाचा शुभारंभ हभप महादेव महाराज यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला कमलाकर दिक्कतवार, डॉ.दिगंबर डोंगरगावकर, किरण बिच्चेवार, नगराध्यक्ष कुणाल राठोड, गजानन चायल, आशिष सकवान, संजय पेन्शन, दिलीप लोहारीकर, विठ्ठल ठाकरे, सूरज दासेवार, गजानन पिंपळे, राहुल खडके आदी उपस्थित होते.
लॉ कॉलेजचे यश
नांदेड - नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मुक्ता पवार हिने तृतीय क्रमांक मिळविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास खाकरे व इतरांनी तिचे स्वागत केले.