नामांतर लढ्यातील शहिदांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:28+5:302021-01-14T04:15:28+5:30
नांदेड -औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी उभारण्यात आलेल्या अभूतपूर्व ...
नांदेड -औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी उभारण्यात आलेल्या अभूतपूर्व लढ्यात शहीद झालेल्या भीमवीरांना प्रजासत्ताक पक्षाच्या वतीने आज, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात येणार आहे.
औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी अभूतपूर्व असे आंदोलन करण्यात आले होते. १६ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर तत्कालीन शासनाने १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्तार ठरावाची अंमलबजावणी केली. त्यानिमित्त पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि युगपुरुष जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. फुले पुतळ्याशेजारील मंडपामध्ये शहीद पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे आणि या लढ्यात महाराष्ट्रातून ज्यांनी स्वत:चे आयुष्य अर्पण केले, अशा सर्व शहिदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रजासत्ताक पक्षाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यासह प्रा. देवीदास मनोहरे, पी. एस. गवळे, ॲड. एम. जी. बादलगावकर, जे. डी. कवडे, डी. पी. गायकवाड, आदींची उपस्थिती राहणार आहे.
शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून शहिदांना मानवंदना द्यावी, असे आवाहन रवी गायकवाड, शीलरत्न चावरे, किशोर अटकोरे, भगवान गायकवाड, प्रकाश लांडगे, विजय गोडबोले, व्यंकट इंगळे, धम्मानंद गजभारे, विकास इंगोले, विजय कदम, विजय थोरात, कपिल वावळे, आदींनी केले आहे.