आळंदीत मसूद देसाईंचा ६० वर्षांचा गड खालसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:33+5:302021-01-21T04:17:33+5:30
पंचायत राज अस्तित्वात आल्यापासून एकाच कुटुंबातील व्यक्ती सरपंचपदावर आरूढ असलेले घराणे म्हणजे आळंदीतील देसाई कुटुंबीय. वडील, आई आणि ...
पंचायत राज अस्तित्वात आल्यापासून एकाच कुटुंबातील व्यक्ती सरपंचपदावर आरूढ असलेले घराणे म्हणजे आळंदीतील देसाई कुटुंबीय. वडील, आई आणि स्वतः काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मसूद देसाई हे येथील आजपर्यंतचे सरपंच होते. या आई-वडील, पुत्राशिवाय येथे चौथा सरपंच झाला नाही. ६० वर्षांची येथील अभेद्य सत्ता आजतागायत या कुटुंबाची राहिली असून, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र नवख्या युवकांनी दिलेल्या आव्हानाला पेलता आले नाही. येथे नऊ जागांच्या येथील ग्रामपंचायतीत देसाई विरुद्ध हरिदास मेहत्री , ब्रह्मानंद अब्दागिरे व अन्य अशी लढत झाली. या निवडणुकीत देसाई यांच्या पॕॅनलचा पूर्णतः सफाया झाला असून, या नवख्या युवकांच्या पॅनलचे आनंदा नायगावे, धोंडिबा चेट्टे, बाबूसाब शेख, नामदेव चिदमलवाड, उज्ज्वला चेट्टे, विश्वनाथ अब्दागिरे, बाळासाहेब चेट्टे, संतोष जुकरे, मारोती धर्मकरे हे नऊ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.