श्यामनगरच्या स्त्री रुग्णालयात आता रात्रीच्या वेळीही प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:15 AM2018-10-29T00:15:05+5:302018-10-29T00:17:52+5:30

या निर्णयामुळे शहर व परिसरातील अडलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे़ त्याचबरोबर विष्णूपुरीच्या रुग्णालयावरील ताणही कमी होणार आहे़

Maternity delivery at Shyamnagar Women's Hospital now at night | श्यामनगरच्या स्त्री रुग्णालयात आता रात्रीच्या वेळीही प्रसूती

श्यामनगरच्या स्त्री रुग्णालयात आता रात्रीच्या वेळीही प्रसूती

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांना दिलासा पूर्वी होती फक्त दिवसाच सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात तब्बल पाच वर्षानंतर रात्रीच्या वेळी महिलांच्या प्रसूतीची सुविधा सुरु करण्यात आली आहे़ यापूर्वी या ठिकाणी केवळ दिवसाच प्रसूती करण्यात येत होती़ या निर्णयामुळे शहर व परिसरातील अडलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे़ त्याचबरोबर विष्णूपुरीच्या रुग्णालयावरील ताणही कमी होणार आहे़
पाच वर्षापूर्वी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या श्यानगर येथील स्त्री रुग्णालयाची जबाबदारी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाकडे देण्यात आली़ त्यानंतर या ठिकाणी शासनाच्या निधीतून नवजात शिशू केंद्रासह अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या़
शहर व परिसरातील महिलांच्या प्रसूतीसाठी या ठिकाणी कक्षही उघडण्यात आला़ त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात आली़ परंतु कर्मचारी संख्या अपुरी असल्याच्या कारणामुळे या ठिकाणी केवळ दिवसाच प्रसूतीची सोय उपलब्ध होती़ त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांना थेट खाजगी रुग्णालय किंवा विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात होता़
त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करीत श्यामनगरपासून जवळपास पंधरा किमी अंतरावर असलेल्या विष्णूपुरी येथील रुग्णालयात जावे लागत होते़ या प्रवासात अनेकवेळा रस्त्यातच अनेक महिलांची वाहनांमध्ये प्रसूती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत़ या सर्व बाबी लक्षात घेता आता श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात रात्रीच्या वेळीही प्रसूतीची सोय करण्यात आली आहे़
त्यासाठी रात्रपाळीतही तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारीकांची नेमणुक करण्यात आली आहे़ अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ़बी़पीक़दम यांनी दिली़ या निर्णयामुळे अडलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे़
ताण होणार कमी
श्यामनगर रुग्णालयात रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांना थेट विष्णूपुरी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात होता़ त्यामुळे विष्णूपुरी येथील रुग्णालयावर मोठा ताण पडत होता़ त्यात वार्डाच्या क्षमतेपेक्षाही अधिक रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते़ आता श्यामनगर येथील रुग्णालयात रात्रीच्या प्रसूतीची सोय झाल्याने विष्णूपुरी येथील रुग्णालयाचा ताण कमी होणार आहे़

Web Title: Maternity delivery at Shyamnagar Women's Hospital now at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.