नांदेड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार मौलाना साबेर फारुखीला औरंगाबादेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:34 PM2018-01-18T16:34:53+5:302018-01-18T16:38:01+5:30

चुनाभट्टी भागात असलेल्या एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या मौलाना साबेर फारुखीला गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे अटक करण्यात आली.  त्यानंतर त्याला  नांदेडमध्ये आणण्यात आले. 

Maulana Saber absconding in rape case in Nanded arrested in Aurangabad | नांदेड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार मौलाना साबेर फारुखीला औरंगाबादेत अटक

नांदेड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार मौलाना साबेर फारुखीला औरंगाबादेत अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे माजलगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर मौलनाने बलात्कार केल्याची तक्रार तिच्या आईने इतवारा ठाण्यात दिली होती. या प्रकरणात फरार असलेल्या मौलाना साबेर फारुखीला आज सकाळी औरंगाबाद येथे अटक करण्यात आली.

नांदेड :  चुनाभट्टी भागात असलेल्या एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या मौलाना साबेर फारुखीला आज सकाळी औरंगाबाद येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला  नांदेडमध्ये आणण्यात आले. 

मदरशात शिक्षण घेण्यासाठी असलेल्या माजलगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर मौलनाने बलात्कार केल्याची तक्रार तिच्या आईने इतवारा ठाण्यात दिली होती. या प्रकरणात माजलगाव येथील तिघांवर यापूर्वीच गुन्हा नोंद आहे. नांदेडच्या चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलित बनात मदरशामध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते. मात्र हा मदरशा चालविणारा मौलाना साबेर फारुखी हा तेथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन त्यांना यातील बाबी उघड केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. याबाबत माजलगाव येथील मुलीच्या पालकांनी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. मुलींचा विनयभंग करणे, अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना उत्तेजीत करणे, त्यांचा छळ करणे व धमकावणे असे प्रकार फारुखी करत असल्याचे पीडित मुलीने पोलिसांनी सांगितले. याबाबतच्या तक्रारीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मौलनाच्या शोधासाठी चार पथकांची स्थापना केली होती. त्यातील एका पथकाने  औरंगाबाद येथे मौलाना साबेर फारुखी याच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणात मौलानाला सहकार्य केल्याप्रकरनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नवाब पटेल, एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख इद्रीस पाशा आणि एका पक्षाचा माजी नगरसेवक खलील गनी पटेल या तिघांनाही अटक केली आहे. 
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत बारा जणांची चौकशी केली असून विनयभंगासोबत पोस्कोचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलाना साबेर फारुखी याला अटक करुन नांदेडात आनले.दरम्यान अटक करण्यात आलेल्या तीन राजकीय कार्यकत्र्यांना १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Maulana Saber absconding in rape case in Nanded arrested in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड