महापौरांनी घेतला पावसाळापूर्व कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:20 AM2021-05-25T04:20:50+5:302021-05-25T04:20:50+5:30
पावसाळा जवळ आला आहे. कामे अपूर्ण राहिल्याने पहिल्याच पावसात नाल्यातील कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे मेअखेरीस नालीसफाईची कामे ...
पावसाळा जवळ आला आहे. कामे अपूर्ण राहिल्याने पहिल्याच पावसात नाल्यातील कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे मेअखेरीस नालीसफाईची कामे पूर्ण झाली पाहिजे. पाणी साचणार नाही व रस्त्यावर घाण येणार नाही, शहरातील सखल भागात पाणी थांबणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. पावसाळ्यात ड्रेनेज चेंबरची झाकणे बसवून घ्यावी. फुटलेल्या चेंबरद्वारे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील रिकाम्या भूखंंडावरील कचरा उचलणे आवश्यक आहे. हिंगोली गेट अंडरब्रिजमध्ये पाणी जमा होणार नाही, याची खबरदारीही घ्यावी. शहरातील पथदिवे सुरू करावेत आदी सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीस उपमहापौर मसूदखान, उपायुक्त शुभम क्यातमवार, सभापती संगीता पाटील, साहाय्यक आयुक्त गुलाब सादिक, विजय येवनकर, शहर अभियंता माधव बाशेट्टी, कार्यकारी अभियंता गिरीष कदम, सुग्रीव अंधारे, कलिम परवेज, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.