धर्माबाद प्रश्नावर १८ जूनला मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:18 AM2018-06-16T00:18:50+5:302018-06-16T00:18:59+5:30
धमार्बाद तालुक्याचा तेलगंणात समावेश करण्याच्या मागणीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आता १८ जून रोजी या विषयावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात बैठक होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.सचिव खल्लाळ यांनी बैठक घेतली या बैठकीला अधिकारी, सरपंच संघटना व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : धमार्बाद तालुक्याचा तेलगंणात समावेश करण्याच्या मागणीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आता १८ जून रोजी या विषयावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात बैठक होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.सचिव खल्लाळ यांनी बैठक घेतली या बैठकीला अधिकारी, सरपंच संघटना व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
धर्माबाद तालुक्याचा तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर सरपंच संघटनेला चर्चेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे निमंत्रण दिले होते़ या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी धर्माबाद तालुक्याचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते़ तसेच या विषयात पालकमंत्री रामदास कदम यांना लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या होत्या़ त्यानंतर पालकमंत्री कदम यांनी या विषयावर १८ जून रोजी मंत्रालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाºयांची बैठक बोलाविली आहे़ तसे पत्रही तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाºयांना मिळाले आहे़ त्यानंतर शुक्रवारी धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी डॉ़सचिन खल्लाळ यांनी सर्व विभागातील अधिकाºयांची बैठक घेतली़
त्यात धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी काय करता येईल? तालुक्याच्या आवश्यक गरजा कोणत्या? सरपंच संघटनेच्या मागण्या? या संदर्भात चर्चा करण्यात आली़ तसेच १८ जून रोजी होणाºया बैठकीला सर्व माहिती अद्ययावत घेवून उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या़
बैठकीला तहसिलदार ज्योती चव्हाण, गटविकास अधिकारी अजयसिंह पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, तालुका कृषी अधिकारी अरविंद जाधव, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत कदम करखेलीकर यांच्यासह २१ विभागाचे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.