एनटीएचा सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:55 PM2019-04-30T23:55:57+5:302019-04-30T23:58:28+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा नीट ५ मे रोजी होणार आहे़ परंतु, परीक्षेच्या पाच ते सहा दिवस अगोदर अचानक परीक्षा केंद्र बदलण्यात आले़

mess created by nta | एनटीएचा सावळागोंधळ

एनटीएचा सावळागोंधळ

Next
ठळक मुद्देनीट परीक्षा : परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची धावपळ

श्रीनिवास भोसले ।
नांदेड : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा नीट ५ मे रोजी होणार आहे़ परंतु, परीक्षेच्या पाच ते सहा दिवस अगोदर अचानक परीक्षा केंद्र बदलण्यात आले़ त्यामुळे नवीन केंद्र असलेले हॉलतिकीट काढण्यासाठी परीक्षार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे़ एनटीएच्या ढिसाळ कारभाराचा फटका परीक्षार्थ्यांना बसत आहे़
एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस यासारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी देशपातळीवर एकच राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा घेतली जाते़ या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात़ यंदाची नीट परीक्षा ५ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे़ यंदा पहिल्यांदाच सदर परीक्षा घेण्याचे काम नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) ला देण्यात आले आहे़ यापूर्वी गतवर्षी सदर परीक्षा सीबीएससी बोर्डामार्फत घेण्यात आली होती़
नॅशनल एलिजिबिलीटी कम एंट्रेंस टेस्ट (नीट) परीक्षेस नांदेड जिल्ह्यातून जवळपास अठरा ते वीस हजार विद्यार्थी सामोरे जातील, अशी माहिती आहे़ नीट परीक्षार्थ्यांना १५ एप्रिलपासून आॅनलाईन हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी हॉल तिकीटच्या प्रिंट काढून घेतल्या आहेत़ विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दिलेल्या पर्यायी चार केंद्रांपैकी एकही केंद्र न देता भलतीकडेच परीक्षा केंद्र दिले आहेत़ तर शेकडो विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेरील केंद्र देण्यात आले़ त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे़
शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शहरी भागातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे़ त्यामुळे पर्यायच कशाला दिले, असा प्रश्न पालकांसह परीक्षार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे़ त्याचबरोबर हॉलतिकीटवर गतवर्षी ड्रेसकोडविषयी माहिती देण्यात आली होती़ परंतु, यंदाच्या हॉलतिकीटवर ड्रेसकोड संबंधित कुठलीच सूचना नाही़
नॅशनल टेस्टींग एजन्सी ही पहिल्यांदाच नीटची परीक्षा घेत असून नियोजन आणि जिल्हा पातळीवर समन्वय साधण्यासाठी त्यांच्याकडून समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत़ नांदेड जिल्हा समन्वयक म्हणून श्रीवास्तव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ परंतु, अचानक परीक्षा केंद्र का बदलले, जिल्ह्यात किती विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत, याविषयी कुठलीही माहिती त्यांच्याकडे अथवा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध होवू शकली नाही़ केंद्र बदलल्याची माहिती वेबसाईटवरदेखील टाकली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले़
परीक्षार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवणे गरजेचे

  • नीट परीक्षेवर हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते़ त्यामुळे एनटीएच्या अशा सावळ्या गोंधळामुळे कोणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये़ ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलले आहेत़ त्या विद्यार्थ्यांपर्यंत सदर माहिती पोहोचविणे गरजेचे आहे़
  • नीटचे परीक्षा केंद्र का बदलले, याविषयीची माहिती नॅशनल टेस्टींग एजन्सीचे जिल्हा समन्वयक यांच्याकडे उपलब्ध होवू शकली नाही़
  • काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलल्यामुळे परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास आपले परीक्षा केंद्र बदलले तर नसेल?, असा प्रश्न पडत आहे़ त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे़

Web Title: mess created by nta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.